आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: मशिनरी दुकानात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, बनावट अाेळखपत्राद्वारे 51 हजारांची तिकीट विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बनावट आयडी तयार करून रेल्वेच्या वातानुकूलित बाेगींच्या आरक्षित तिकिटांची सर्रास विक्री करणाऱ्या जळगावच्या एका दुकानदारास मुंबईच्या रेल्वे पोलिसांनी रविवारी अटक केली. विकास केदारनाथ बिर्ला असे अाराेपीचे नाव आहे. बिर्ला याच्याकडून ५१ हजार ५०० रुपये किमतीची २४ बेकायदा रेल्वे तिकिटे विक्री झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सखाेल चाैकशीत अाणखीही माहिती समाेर येण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली.  

जळगाव महापालिकेसमोरच असलेल्या बिर्ला यांचे विकास मशिनरी नावाचे दुकान आहे. याच दुकानातून रेल्वेच्या आरक्षित तिकिटांची विक्री हाेत असे.  सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने  सर्वच रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल अाहे. त्याचाच फायदा घेत पैसे घेऊन अनिधकृतपणे कन्फर्म तिकीट विक्रीचे प्रकार सुरू होते.  

यासंदर्भात मुंबईच्या िव्हजिलन्स विभागाला गुप्त माहिती मिळाली. त्यावरून व्हिजिलन्स विभागाचे पोलिस निरीक्षक अतुल क्षीरसागर, भुसावळचे पोलिस निरीक्षक अतुल टोके, जळगावचे पोलिस निरीक्षक गोकुळ सोनोनी, पोलिस उपनिरीक्षक फरियाद खान, कुलदीप सिंग, डी. के. सोनवणे, नीलेश अडवाल, रिहान अहमद, बी. के. पाटील यांच्या पथकाने रविवारी दुपारी १२ वाजता बिर्लाच्या दुकानात छापा मारला. शहर पोलिसांचीही मदत घेण्यात अाली. दुपारी १२ वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत सुमारे दीड तास कसून चाैकशी करण्यात अाली. दुकानातील एक लॅपटॉप, प्रिंटर, काही तिकिटे व कागदपत्रांसह विकास बिर्ला यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.      
सर्व तिकिटे रद्द हाेणार 
रेल्वेस्थानकावरील पोलिस स्टेशनमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली. बिर्लाच्या लॅपटॉपमध्ये नोंद असलेल्या प्रत्येक ई- तिकिटाची माहिती घेऊन पडताळणी करण्यात आली. यात २४ अनधिकृत आरक्षणाची तिकिटे असल्याचे आढळून आले. त्यांची किंमत ५१ हजार ५०० रुपये आहे. बिर्लाकडून विक्री झालेली ही २४ तिकिटे आता रेल्वे प्रशासन रद्द करणार आहे. त्यासाठीची कारवाई रविवारीच सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अाराेपी बिर्लास अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता त्याला भुसावळच्या रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

चौकशी सुरू असताना ग्राहक दारात हजर
चौकशी सुरू असतानाच श्रीरंग जोशी हे बिर्लाच्या दुकानात आले होते. जोशी यांनी जळगावहून कर्नाटकला जाण्यासाठी बिर्लाकडून ितकीट काढले होते. हे तिकीट घेण्यासाठी बिर्लाने रविवारी दुपारी एक वाजता जोशींना बोलावले होते. ते दुकानात आल्यावर मात्र कारवाई सुरू असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी थेट पोलिसांकडेच चौकशी केली. आपण काढलेले तिकीटदेखील अनधिकृत असल्याचे चौकशीतून समोर आल्यानंतर जोशी यांनाही रिकाम्या हाती परत जावे लागले.    

कार्यक्रम असल्याने कुटुंबीयांची गयावया  
रविवारी बिर्ला यांच्या घरी कौटंुबिक कार्यक्रम होता. मात्र, त्याच दिवशी असा प्रसंग ओढावल्यामुळे कुटंुबीय गोंधळात पडले होते. तसेच बिर्ला यांच्या वृद्ध आईंना प्रकृती खराब असल्यामुळे रविवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे बिर्ला यास रविवारीच न्यायालयात हजर करावे, अशी विनंती त्यांच्या कुटंुबीयांनी पोलिसांकडे केली होती, पण ते नियमात बसत नसल्यामुळे पोलिसांनी मदत करणे टाळले. 
बातम्या आणखी आहेत...