आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे तिकीट आरक्षणाची रात्री १० वाजेपर्यंत सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - ऑनलाइन रेल्वे तिकीट आरक्षणाला अधिक प्रतिसाद मिळत असतानाही, बहुतांश प्रवासी रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडकीचा वापर करतात. त्यामुळे भुसावळ स्थानकावरील एक आरक्षण खिडकी रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळत आहे. पंधरवड्यापासून याची अंमलबजावणी सुरू आहे.
तत्पूर्वी रात्री वाजेपर्यंतच तिकीट आरक्षण केले जात होते. मात्र, व्यापारी वर्गाला दिवसभरातील कामे आटोपून तिकीट आरक्षण करण्यासाठी रात्री धावपळ करावी लागत होती. त्यामुळे सुरुवातीला प्रायाेगिक तत्त्वावर तिकीट खिडकी रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली. याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने आता दुपारी ते रात्री १० वाजेपर्यंत दुसऱ्या शिफ्टमध्ये तिकीट आरक्षण सुरू करण्यात आले आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावरील चार तिकीट आरक्षण खिडक्यांपैकी, एक खिडकी रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवली जात आहे.

अर्जांचीसंख्या वाढली
पूर्वीचार आरक्षण खिडक्यांवर दररोज हजार तिकीट आरक्षण अर्ज येत होते. मात्र, दोन तासांची मुदतवाढ मिळाल्याने आता अर्जांची संख्या जवळपास १७०० झाली आहे. तिकीट आरक्षणातून भुसावळ रेल्वे प्रशासनाला रोज लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त होते.