आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Will Save12 Million Liters Of Water Per Day

रेल्वे करणार दररोज १२ लाख लिटर पाणीबचत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - फलाटांसहरेल्वेगाड्यांची स्वच्छता करण्यासाठी दररोज १२ लाख लिटर शुद्ध पाणी वापरले जाते. मात्र, आता डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी या कामासाठी राॅ-वाॅटर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. राॅ-वाॅटरचा वापर करण्यासाठी ९०० मीटर अंतराची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. म्हणून आता दररोज १२ लाख लिटर शुद्ध पाण्याची बचत होणार आहे.
भुसावळ रेल्वे प्रशासनाला दररोज आपल्या हद्दीतील वविधि कार्यालये, कर्मचारी, अधिकारी नविासस्थाने, फलाटांवर रेल्वेगाड्यांची स्वच्छता करणे या कामासाठी दररोज लाख ४० लाख लिटर पाणी लागते, हे सर्व पाणी फिल्टर केलेले असते. परंतु, गरज नसताना शुद्ध पाण्याचा अपव्यय होत असल्याची ओरड वाढल्यानंतर डीआरएम गुप्ता यांनी साफसफाईसाठी शुद्ध पाण्याचा वापर करू नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुषंगाने आता रेल्वे मैदानाजवळील फिल्टर हाऊसपासून ते रेल्वेस्थानकापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ‘दवि्य मराठी’ने गेल्या दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात भूमिका मांडली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन आता शुद्ध पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी कृतिशील पाऊल उचलले आहे.

दोन फलाटांवर वितरिका
रेल्वेगाड्याधुण्यासाठी ९०० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. महिनाभरापासून हे काम सुरू होते, आता ते पूर्ण झाल्याने रेल्वेस्थानकावर राॅ-वाॅटर पुरवले जाणार आहे. त्यामुळे दररोज १२ लाख लिटर शुद्ध पाण्याची नासाडी थांबेल. फलाट क्रमांक सात आठ या ठिकाणी वितरिका तयार करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावरील पाणी योजनेला जोडल्या जातील.

नवी दिशा मिळाली
पाण्याचेमहत्त्व ओळखून रेल्वे प्रशासनाने घेतलेला धोरणात्मक निर्णय नवी दिशा देणारा आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक पर्यावरणप्रेमी, जलतज्ज्ञांकडून मांडण्यात आलेल्या प्रश्नावर सकारात्मक पाऊल उलचण्यात आले आहे. इतर स्थानकांसाठीही हा प्रयोग पथदर्शी ठरू शकतो.

तीन कोटींच्या खर्चात बचत
रेल्वेस्थानकगाड्या धुण्यासाठी राॅ-वाॅटर वापरण्याच्या निर्णयामुळे खर्चातही बचत होईल. १५ लाख लिटर पाणी शुद्धीकरणासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार केले असते, तर त्यासाठी किमान तीन कोटी रुपये खर्च लागण्याची शक्यता होती. मात्र, नवीन जलशुद्धीकरण केंद्रापेक्षा साफसफाईसाठी राॅ-वाॅटरचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हा खर्च वाचवणे शक्य झाले.

अंमलबजावणी करू
रेल्वेगाड्यांचीवाॅशिंग फलाट धुण्यासाठी आता राॅ-वाॅटर वापरले जाईल. येत्या आठवडाभरात किंवा पंधरवड्यात प्रत्यक्षात या पाण्याचा वापर होईल. रेल्वे प्रशासनाच्या खर्चातही बचत करणे शक्य आहे. जास्तीत जास्त पाण्याची बचत कशी होईल? असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांचे यासाठी मार्गदर्शन लाभत आहे. राजेंद्रदेशपांडे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, रेल्वे