आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारीचे निवारण अाता १५ मिनिटांतच हाेणार! रेल्वे ‘क्लीन माय काेच’ अॅप विकसित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वे स्थानकांसहधावत्या रेल्वेगाड्यांमधील साफसफाईवर रेल्वे मंत्रालयाकडून अधिक भर दिला जात अाहे. त्यामुळे प्रवासादरम्यान रेल्वेतील अस्वच्छतेबाबत, प्रवाशांना मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत गाडीत स्वच्छता केली जाईल. तसेच प्रवाशांकडून स्वच्छतेचा दाखला घेतला जाणार अाहे.

भुसावळ विभागातून धावणाऱ्या १७ रेल्वेगाड्यांमध्ये या याेजनेची प्रायाेगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जात अाहे. रेल्वे डब्यातील अस्वच्छतेची प्रवाशांनी अाॅनलाइन तक्रार केल्यावर, अवघ्या १५ मिनिटांत रेल्वे प्रशासनाकडून त्याचा निपटारा केला जाईल. या योजनेसाठी रेल्वे प्रशासनाने मोबाइल अॅप तयार केले अाहे. ‘क्लीन माय काेच’असे त्याचे नाव आहे. गुगलच्या प्ले-स्टाेअरमधून प्रवाशांना हे अॅप माेफत डाऊनलोड करता येईल. रेल्वे मंत्रालयाने काही निवडक अाणि लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांमध्ये साफसफाईची ही सुविधा उपलब्ध करून दिली अाहे. त्यासाठी रेल्वेने विशेष पथक नियुक्त केले अाहे. सकाळी ते रात्री या काळात पथकातील कर्मचारी डबा स्वच्छ करतील. डब्यात अस्वच्छता असेल किंवा सफाईबाबत प्रवासी असमाधानी असल्यास सरळ अॅपद्वारे तक्रार नाेंदवू शकतात. भुसावळ विभागातून धावणाऱ्या १७ रेल्वेगाड्यांमध्ये या याेजनेची प्रायाेगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जात अाहे. रेल्वे डब्यातील अस्वच्छतेची प्रवाशांनी अाॅनलाइन तक्रार केल्यावर, अवघ्या १५ मिनिटांत रेल्वे प्रशासनाकडून त्याचा निपटारा केला जाईल.
अशी करा तक्रार
गुगलच्याप्ले-स्टाेअरमध्ये जाऊन ‘क्लीन माय काेच’ हे अॅप डाऊनलाेड करून घ्या. तक्रार करताना तिकिटावरील पीएनअार क्रमांक टाकावा लागेल. त्यामुळे या माहितीचा संदेश गाडीत असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे जाईल. यात प्रवाशांचा बर्थ क्रमांक, प्रवासी कुठे जाण्यासाठी प्रवास करत अाहे. कोच क्रमांक काेणता अाहे, याची सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांना एसएमएसद्वारे मिळेल. अॅपद्वारे तक्रार केल्यास अवघ्या १५ मिनिटांत तिचे निवारण हाेईल. मात्र, तक्रारीचे निवारण झाल्यानंतर संबंधित प्रवाशांकडून संमतीपत्र लिहून घेण्यात येणार अाहे, हे विशेष.

या गाड्यांमध्ये मिळेल सुविधा
भुसावळविभागातून धावणाऱ्या १७ रेल्वेगाड्यांमध्ये प्रायाेगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात अाली अाहे. पंजाब मेल, एलटीटी-गाेरखपूर स्पेशल प्रीमिअर, एलटीटी-वाराणसी प्रीमिअर, कुशीनगर एक्स्प्रेस, गाेदान एक्स्प्रेस, पठाणकाेट एक्स्प्रेस, छपरा-गाेदान एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, साकेत एक्स्प्रेस, तुलसी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, लखनऊ सुपरफास्ट, पटना एक्स्प्रेस, एलटीटी-हबीबगंज, लष्कर एक्स्प्रेस, एलटीटी-निजामुद्दीन एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासनाने ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देणार आहे.
रेल्वेगाडीतच साफसफाईची सेवा सुरू केली अाहे. यासाठी ‘क्लीन माय काेच’ नावाचे अॅप तयार केले अाहे. मनोजकुमार गांगेय, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...