आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे जलशुद्धीकरण केंद्रात अतिरिक्त ‘सेटलिंग टँक’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पावसाळ्याच्याकाळात रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रात गढूळ गाळमिश्रित पाण्याची समस्या निर्माण होते. ही समस्या निकाली काढण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात नऊ लाख लिटर क्षमतेचा अतिरिक्त सेटलिंग टँक निर्माण केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच सेटलिंग टँक उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

नवीन टँकच्या उभारणीमुळे रेल्वे जलशुद्धीकरण केंद्रातील सेटलिंग टँकची संख्या पाच होणार आहे. रेल्वे परिसराचा विस्तार मोठा असल्याने दररोज पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अधिकारी कर्मचाऱ्यांची नविासस्थाने, रेल्वेची विविध कार्यालये, रेल्वेस्थानक, पीओएच, झेडटीएससह स्थानकावरील वापरासाठी दररोज कोटी ४० लाख लिटर पाण्याची गरज भासते. त्यासाठी तापी पात्रातील बंधाऱ्यातून रेल्वे प्रशासन पाण्याची उचल करते. जलशुद्धीकरण केंद्रात या पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर स्थानकासह रेल्वेच्या परिसरात पाणी वितरित केले जाते. मात्र, पावसाळ्याच्या काळात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो. त्यामुळे गाळमिश्रित पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करताना अडचणी येतात. ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त सेटलिंग टँक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

४० लाखांचा खर्च : रेल्वेच्याजलशुद्धीकर केंद्रातील अतिरिक्त, पाचव्या सेटलिंग टँकच्या उभारणीसाठी सुमारे ४० लाखांचा खर्च येणार आहे. यासंदर्भात डीआरएम गुप्ता यांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्याने, प्रस्ताव आता संबंधित विभागाकडे रवाना केल जाईल. त्यानंतर खर्चाची तरतूद झाल्यानंतर टँक उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. आगामी वर्षभराच्या कालावधीत टँक उभारणीचे काम पूर्ण होणार आहे.


सध्यारेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रात चार सेटलिंग टँक आहेत. त्यातील तीन टँकची एकत्रित क्षमता नऊ लाख लिटर इतकी आहे, तर एक टँक साडेचार लाख लिटर क्षमतेचा आहे. सध्या या चार टँकद्वारे शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. सद्य:स्थितही रेल्वेच्या हद्दीत शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, नवीन सेटलिंग टँकमुळे शुद्धीकरण प्रक्रिया अधिक चांगल्याप्रकारे करता येईल, तसेच पावसाळ्यातील गाळमिश्रित पाणी शुद्ध करण्यासाठी, अतिरिक्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अॅलम साठयाची बचत करता येणार आहे.


मीटर नवीन टँकचा व्यास
डीआरएम गुप्तांनी केली होती पाहणी : रेल्वेच्याजलशुद्धीकरण केंद्राला डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी भेट देऊन नुकतीच पाहणी केली होती. त्या वेळी नवीन सेटलिंग टँकची गरज असल्याचे त्यांच्या नदिर्शनास आले, त्यामुळे नवीन टँकचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सेटलिंग टँकच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे.

नवीन टँकची कार्यपद्धती : रेल्वेच्याजलशुद्धीकरण केंद्रातच नवीन सेटलिंग टँकची निर्मिती केली जाणार आहे. नदीपात्रातून उचलण्यात आलेले गाळमिश्रित पाणी शुद्धीकरणापूर्वी या टँकमध्ये सोडले जाईल. त्यामुळे पाण्यासाेबत आलेला गाळ तळाशी जमा होईल, त्यानंतर पाण्यावर प्रक्रिया केली जाईल. गाळ बाजूला झाल्यामुळे आगामी काळात जल शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक चांगली होईल.
बातम्या आणखी आहेत...