आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराच्या पावसाने रब्बीचा पेरा १५ टक्क्यांनी वाढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - यंदाच्या खरिपात समाधानकारक पाऊस झाला. आता उत्तरा नक्षत्रातही सलग चार दिवस पाऊस झाल्याने अवर्षणप्रवण भाग असलेल्या भुसावळ तालुक्यात यंदा रब्बीच्या हंगामाखालील क्षेत्र वाढणार आहे. भुसावळ तालुक्यात सरासरी १२ हजार हेक्टरवर रब्बीचा हंगाम होतो. यंदा मात्र यात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होऊन हे क्षेत्र १४ हजार हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
भुसावळ तालुक्यात २४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यात प्रामुख्याने १८ हजारक्षेत्र जिरायती आहे. यामुळे रब्बी हंगामाचे प्रमाण कमी असते. मात्र, उत्तरा नक्षत्रात शेवटचा पाऊस झाल्यास रब्बीचा हंगाम वाढतो. सन २०१३ ते १४ या वर्षातही उत्तरा नक्षत्रासह ऑक्टोबर महिन्यातही पाऊस झाला होता. जमिनीत अधिक प्रमाणात ओलावा असल्याने यावर्षीही भुसावळ तालुक्यात रब्बीचा पेरा वाढला होता. मात्र, जानेवारीत झालेल्या बेमोसमी पावसाने रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते. यंदाच्या वर्षात बेमोसमी पावसाची शक्यता नसल्याने यंदा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

भुसावळ तालुक्यात वरणगाव, तळवेल, साकरी, फेकरी, सुनसगाव, वराडसिम आदी सिंचनाच्या सुविधा असलेल्या भागात रब्बीचा हंगाम अधिक असतो. मात्र, यंदाच्या मान्सूनमध्ये उत्तराच्या पावसामुळे उर्वरित जिरायती क्षेत्रावरही रब्बीचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, जिरायती क्षेत्रावर हरभरा, करडई, सूर्यफूल, दादर आदींचा तर बागायती क्षेत्रावर गहू, हरभरा, कांदा आदी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये भुसावळ तालुक्यात सरासरी इतका पाऊस झाला नसला तरी वेळेवर पाऊस होत गेल्याने खरिपाचेही उत्पन्न चांगले येणार आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप रविवारी सकाळपासून थांबली. सायंकाळी वाजता अाकाश अाभ्राच्छादित हाेते.

भूजल पातळी वाढणार : उत्तरानक्षत्राच्या पावसामुळे भूजलपातळी वाढते, असा अंदाज शेतकरी वर्तवतात. गेल्या वर्षी उत्तराचा पाऊस नव्हता. यामुळे उन्हाळ्यात अनेक भागांतील जलपातळी घटली. पाण्याच्या समस्येने तोंड वर काढले होते. मात्र, या पावसामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत होणार असून टंचाईवर मात करता येईल.

Á१० तास मिळताे वीजपुरवठा : बहुतांशअल्पभूधारक शेतकऱ्यांकडे विहीर किंवा कूपनलिका आहेत. मात्र, त्यांची जलपातळी कमी आहे. यापूर्वी केवळ आठ तास वीज मिळत होती. यामुळे पाण्याचा भरणा करणे शक्य होत नव्हते. आता शासनाच्या निर्णयानुसार दोन तासांचा वेळ वाढला आहे. शेतीला आता आठऐवजी १० तास वीज मिळते. या सकारात्मक निर्णयामुळेही रब्बीचे क्षेत्र वाढेल.

कालव्यामुळे सिंचनाची सुविधा
हतनूरच्या उजव्या तट कालव्यातून यावल चोपडा तालुक्यासाठी रब्बी हंगामासाठी विसर्ग केला जातो. सध्या धरणात समाधानकारक जलसाठा आहे. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यादरम्यान रब्बीसाठी आवर्तन सोडले जाईल. यामुळे यावल तालुक्यातील रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. रावेर तालुक्यातही सिंचनाखालील क्षेत्र अधिक असल्याने यावल रावेर तालुक्यात यंदा रब्बी क्षेत्रात वाढ होणार आहे.

कांदा लागवडीचे नियाेजन
साकरी, वरणगाव, तळवेल परिसरात कांदा लागवड केली जाते. मात्र, सध्या कांद्याचे दर निच्चांकी आहेत. गेल्या हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे. कांद्याचे क्षेत्र कमी असल्याने शासनाच्या कांदा चाळ योजनेचा लाभच मिळत नाही. यामुळे साठवणुकीसाठीही शेतकऱ्यांना अडचणी येतात. कांदा निघण्याच्या वेळी भाव निच्चांकी राहतो. सध्याही स्थिती पाहता भाव निच्चांकी राहण्याचे संकेत असल्याने कांदा लागवड करायची की नाही? याचे नियाेजन केले जात अाहे.

हरभऱ्याला सर्वाधिक पसंती
^जमिनीतरब्बीच्या हंगामापर्यंत ओलावा कायम राहिल्यास किमान १५ टक्के क्षेत्रवाढ निश्चित होईल. प्रामुख्याने हरभरा पिकाला शेतकरी अधिक पसंती देतील, असा अंदाज आहे. हरभरा पिकास नंतर जाेरदार पाऊस नसला तरी थंडी हिवाळ्यातील गारव्यामुळे पीक बहरते. परतीच्या पावसामुळे हरभरा पेरणी अधिक हाेण्याची शक्यता अाहे. -श्रीकांत झांबरे, कृषी अधिकारी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...