आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात 137 मिलिमीटर पाऊस , दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पावसाच्या दमदार आगमनामुळे बुधवारी भागलपूर एलटीटी, पठाणकोट, गोरखपूर एलटीटी, काशी, रत्नागिरी व शालिमार एक्स्प्रेस अशा सहा रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा एक ते दीड तास उशिराने धावत आहेत. पावसाचा मुक्काम लांबला तर रेल्वेसेवा विस्कळीत होऊ शकते.

मुंबईकडून येणारी महानगरी, गीतांजली एक्स्प्रेस, देवळाली भुसावळ शटल या गाड्या एक तास उशिराने धावत आहेत. तसेच बिहारमध्ये हावडा मुलसराय या मार्गावरील बुराडू आणि इस्लामपूर या मार्गावरील रेल्वेरूळ नक्षलवाद्यांनी उखडून टाकल्याचा परिणामही रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.
दरम्यान, भुसावळ विभागात येणार्‍या सर्वच गाड्यांची रेल्वे सुरक्षा बलाकडून कसून तपासणी केली जात आहे. निरीक्षकांना सजग राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत, असे आरपीएफ आयुक्त चंद्र मोहन मिर्श यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
सहा रेल्वेगाड्या दीड तास उशिराने
पापानगरात घराचे छत आणि भिंत कोसळल्याने 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहरातील जामनेर रोडवरील लक्ष्मी गॅरेजसमोर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे.
जुना सतारे भागाकडे जाणार्‍या रेल्वेच्या दगडी पुलाखालील बोगद्यात पाणी साचले आहे.
बसस्थानकाच्या आवारातही पाणी साचले आहे. तापीनगरात कडुनिंबाच्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळली. दिवसभरात चार वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
अंजाळेजवळ तापीचे बॅकवॉटर मोर नदीत शिरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. बसफेर्‍या भालोद, बामणोद मार्गे वळवण्यात आल्या. मोर नदीवरील पुलापर्यंत पाणी पोहोचले.
शिवाजीनगर भागातील नाल्यालाही पूर आला. खडका रोड, पापानगर भागांत पाण्याचे मोठमोठे तळे साचले. नाल्याच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.