आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणाच्या शेवटच्या दिवशी धो..धो... दीड तासात रस्त्यांवर साचले पाण्याचे तळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावण पूर्ण कोरडा गेल्यानंतर शेवटच्या दिवशी, सोमवारी दुपारी ४.३५ वाजता शहरासह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाण्याचे मोठे तळे साचले होते.
जोरदार पावसामुळे पाण्याचे डबके साचल्याने बजरंग बोगद्यातून येणारी वाहतूक काही वेळ बंद झाली होती. तसेच सरस्वती डेअरी, नवीपेठेत दुकांनाच्या तळाची पातळी पाण्याने गाठल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
दिवसभर होता उकाडा
जुलैमहिन्यात दोन-तीन दिवसांत पावसाने बॅकलॉग भरून काढला होता. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली होती. महिनाभरानंतर म्हणजेच थेट श्रावणातील शेवटचे दोन दिवस पावसाने हजेरी लावली. आठवडाभरापासून दुपाच्यावेळी उन्हाचे चटके अन् वातावरणात कमालीची आद्रर्ता असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. सोमवारी दुपारी ४.३५ वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा वेग कमी झाला असला तरी सायंकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जळगावकर सुखावले आहेत.