आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेमोसमीचा फटका: राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस; जळगावात तिघांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/पुणे- जळगाव जिल्ह्यात रविवारी अवकाळी पाऊस गारपीट झाली. अवकाळी पाऊस उष्माघातामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. यावल तालुक्यात दोन जखमी झाले, तर जळगाव तालुक्यात उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.

चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील पीतांबर हिरामण सूर्यवंशी (वय 21) हा तरुण बहाळ शिवारातील भटू माळी यांच्या शेतात विहिरीचे काम करीत होता. सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. या वेळी विहिरीवर काम करणाऱ्या पाच ते सहा मजुरांपैकी पीतांबर सूर्यवंशी हा निंबाच्या झाडाखाली उभा होता. त्यावेळी अंगावर वीज पडल्याने पीतांबरचा जागीच मृत्यू झाला. दुसरी घटना तालुक्यातील पिंप्री प्र.दे. शिवारात घडली. पिलखोड येथील किरण सतीलाल भील (वय २२) हा विनोद पाटील यांच्या शेतात मजुरीचे काम करीत होता. सायंकाळी वाजून २० मिनिटांनी अचानक वीज पडून किरण भील याचा मृत्यू झाला.

सावखेड्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील शेतकरी सोपान रघुनाथ पाटील (वय ४१) यांचा रविवारी उष्माघाताने मृत्यू झाला. ते सकाळी शेतात गेले होते. दुपारी वाजेच्या सुमारास त्यांना त्रास होत असल्याने ते घरी आले. त्यांनी थंड पाण्याने अंघोळ केली. त्यानंतर चक्कर येऊन ते खाली पडले अाणि त्यांचा मृत्यू झाला.

भुसावळ, पारोळ्यात पाऊस
भुसावळ शहरासह तालुक्यातील साकेगाव, कंडारी, वरणगाव परिसरातील काही गावांमध्ये रविवारी रात्री सव्वा आठ वाजेदरम्यान बेमोसमी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांसह तब्बल १५ मिनिटे पाऊस झाला. बेमोसमी पावसामुळे तालुक्यात कोठेही नुकसानीची नोंद नसली तरी वातावरणातील उष्णता वाढली होती. पावसादरम्यान महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाला.पाराेळ्यात सांयकाळी च्या सुमारास गारपीट झाली.

राज्यात रविवारी अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. अकोला, अमरावती, नाशिक जिल्ह्यात तर, मराठवाड्यात औरंगाबाद शहर जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारी गडगडाटासह पाऊस पडला. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सोमवार-मंगळवार असे दोन दिवस तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

यावल- तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. किनगाव, चिंचोली, डांभुर्णी, नायगाव, मालोद, वाघझिरा परिसरात ४.१५ वाजेच्या सुमारास सव्वा तास अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे केळी, मका, ऊस खांडणी केलेला कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सायंकाळी वाजेच्या सुमारास महाराणा प्रतापनगरात प्रचंड कडकडाटासह एका घराजवळ वीज कोसळली. या घटनेत काजल भूषण कोळी (वय १९) रंजना सुनील कोळी (वय २०) या दोन्ही महिला जखमी झाल्या. त्यापैकी काजल यांची प्रकृती गंभीर आहे. तालुक्यात मेघगर्जनेसह गारपीट पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे किनगाव येथील उपबाजार समितीच्या आवारातील सुमारे दोन हजार क्विंटल मका भिजला. परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला मका भिजल्याने नुकसान झाले.
बातम्या आणखी आहेत...