आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पावसाचा तिसर्‍यांदा तडाखा, आठ तास वीजपुरवठा खंडित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरासह तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. झाडे उन्मळून पडल्याने तालुक्यात सहा घरांचे नुकसान झाले. तर वीजतारा तुटल्याने गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित हाेता. परिणामी नागरिकांना संपूर्ण रात्र अक्षरश: जागून काढावी लागली.

वळवाच्या पावसाने बुधवारी तालुक्यात प्रचंड वादळ, विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. रात्री वाजता खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुरळीत झाला. जुनी आरपीएफ बॅरेक, पालिका जलशुद्धीकरण केंद्र, साेनिच्छावाडी, पंधरा बंगला भागातील रेल्वे वसाहत परिसरात जीर्ण झालेल्या झाडांच्या फांद्या वादळामुळे तुटून घराच्या छतांवर काेसळल्याने आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने मात्र, जीवितहानी टळली. जुनी आरपीएफ बॅरेक भागातील रेल्वे हद्दितील सहा घरांवरील पत्रे फुटली आहेत. सिद्धिविनायक काॅलनी भागातील वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला हाेता.

मंडळनिहाय पाऊस असा
पिंपळगाव : ०६ मिमी
कुऱ्हा : ०८ मिमी
भुसावळ : २०.३ मिमी
वरणगाव : १५ मिमी

गाळ काढण्याची कामे खाेळंबणार
भुसावळतालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गेल्या दाेन आठवड्यांपासून तलाव, नाल्यांतील गाळ काढणे, शेततळ्यांची कामे सुरू आहेत. मात्र, वळवाच्या पावसामुळे ही कामे पुढील दाेन दिवस खाेळंबण्याची िचन्हे आहेत. गुरुवारी दिवसभर ढगाळ हवामान असल्याने पुन्हा पावसाची शक्यता असल्याने त्याचा परिणाम येत्या रविवारच्या कैरी बाजारावर हाेऊ शकताे. महसूल कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक पंचनामा केला असला तरी प्रत्यक्षात भरपाई कधी मिळते? याची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे.

लाख ८७ हजारांचे झाले नुकसान
भुसावळ मंडळात भुसावळ शहरातील तीन, फेकरीत एक अशा चार घरांचे लाख ९९ हजारांचे नुकसान झाले. पिंपळगाव मंडळातील खंडाळ्यात तीन घरांचे, कुऱ्हे मंडळात मिरगव्हाण येथे वीज काेसळून एका घराचे ९८ हजारांचे नुकसान झाले. तालुक्यात एकूण आठ घरांचे लाख ८७ हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक पंचनामा मंडळाधिकारी तलाठ्यांनी केला आहे.

भाजीपाला, चारा झाला मातीमाेल
वरणगाव,तळवेल, कठाेरा, कुऱ्हे पानाचे, साकेगाव परिसरात भाजीपाला गुरांच्या चार्‍याचे नुकसान झाले. काही ठिकाणी तर केळीच्या बागा जमीनदाेस्त झाल्या आहेत. फुलशेतीचीही प्रचंड हानी झाली. गेल्या दोन महिन्यात तिसर्‍यांदा वादळी पावसाचा तडाखा भुसावळ तालुक्याला बसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रब्बीचा हंगामही उद‌्ध्वस्त झाला आहे. जवळपास एक तास झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. लग्नतिथीचे असल्याने अनेक ठिकाणी मंडपांचे माेठे नुकसान झाले.

बाजाराचा विचार करा :जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र जास्त असले तरी उत्पादकता कमी आहे. शिवाय बाजारपेठेतून चांगला भाव मिळेलच, याची शाश्वती नाही. या उलट तूर, सोयाबीन, मका आदी पिके शेतकर्‍यांना फायदेशीर ठरू शकतात, असाही एक मतप्रवाह आहे.
बातम्या आणखी आहेत...