आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबार पेरणीचे टळले संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - चाळीसगाव तालुक्यातील 5000 हेक्टरवरील पिकांना बुधवारी रात्री झालेल्या पेरणीला आलेल्या पावसाने तूर्त जीवदान मिळाले आहे. याचबरोबर या पावसाने पेरणी झालेल्या क्षेत्राचे दुबार पेरणीचे संकट या पावसाने टळले आहे.वाघळीसह, पातोंडा परिसरात ज्या शेतक-यांनी लागवड केली नव्हती. त्या भागात शेतकरी आज लागवड करताना दिसून आले. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा पट्टा व भडगाव तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये समाधान आहे.

मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्यावर बुधवारीच सायंकाळी दोन तास चाळीसगाव परिसराला पावसाने झोडपले. या आठवड्यात पाऊस पडला नसता तर दुबार पेरणीचे संकट ओढवले असते. पावसाने नदी, नाले खळखळले. मेहुणबारे, धामणगाव, खडकीसीम, पातोंडा, वाघळी, वरखेडे पट्ट्यातही पाऊस झाला. तळेगाव, हिरापूर, पिंपळगाव भागात मात्र पावसाने पाठ फिरवली. तालुक्यात 2 व 16 जूनला झालेल्या पावसानंतर 5258 क्षेत्रावर बागायत तर 3311 हेक्टरवर जिरायत कापसाची लागवड झाली. होती. मक्याची 693 हेक्टरवर लागवड झाली होती. बुधवारच्या पावसाने जवळपास पाच हजार हेक्टरवरील पिकांना सलाईन मिळाली. सकाळी जमिनीबाहेर आलेले कापसाचे पीक सरळ उभे राहिले. मागील आठवड्यापर्यंत पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट ठाकले होते. या पावसाने शेतकºयांमध्ये समाधान आहे. मात्र, पावसाला पुन्हा ब्रेक लागू नये, अशी अपेक्षा आहे. या पावसाने जमिनीतील उष्णतेचे प्रमाण नाहीसे झाल्याने अधिक काळापर्यंत जमिनीतील ओलावा राहील.

भडगाव, नगरदेवळ्यात पाऊस
गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास नगरदेवळा,बदरखे येथे 40 मिनिटे पावसाने झोडपले. तर भडगाव शहरासह वडजी, वाक, टोणगावलाही जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. बहुतांश शेतकºयांनी धूळपेरणी केली होती. कापसाचे पीक वाचणार असून एका दिवसाचा पाऊस पिकांसाठी नक्कीच सलाईन ठरेल.