आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरात अवकाळी पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वादळी पावसाच्या आगमनामुळे शहरातील अनेक भागातील वीज खंडित करण्यात आली होती. तसेच जीएस मैदानावर सुरू असलेला आनंद मेळादेखील बंद करण्यात आला होता. अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर प्रकाश सपकाळे यांनी आनंद मेळाच्या व्यवस्थापनाला सूचना देऊन मेळा बंद करण्यासाठी सांगितले. दुपारपर्यंत वातावरण तापले असताना सायंकाळी झालेल्या पावसात भिजण्याचा आनंद अनेकांनी लुटला. चिमुरड्यांनी पावसात नृत्य करून आनंद व्यक्त केला. पाऊस थांबल्यानंतर रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

पावसाने उडाली धांदल
सोमवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपिटीने शहरात हजेरी लावली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात उष्णता वाढत होती. अशा वेळी पडलेल्या पावसामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला. मात्र, हा पाऊस रब्बी पिकांसाठी नुकसानदायक आहे. सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शहरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी यात वादळाची भर पडली. पाहता-पाहता विजेच्या कडकडाट करत पावसाने हजेरी लावली. सायंकाळी 6 ते 10.30पर्यंत पाऊस सुरू होता. रायसोनीनगर, महाबळ, रामेश्वर कॉलनी, वाघनगर, आरएल कॉलनी या भागात गारपीट झाली.