आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरात अर्धा तास ऊन पावसाचा खेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - शहर व परिसरात बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पावसाने अर्धा तास हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. पावसाअभावी जनता हवालदिल झाली होती. मात्र, सकाळीच वातावरणात बदल जाणवू लागला होता. अमळनेर शहर तसेच कन्हेरे, सडावण, फाफोरे, बु.,ख. अंबापिंप्री, तर अमळनेर शहरासह झाडी, ढेकूसीम या भागात कमी, अधिक स्वरुपात पाऊस झाला. बाजार समितीतही उघड्यावरील धान्य पावसात भिजले. ठरवत पावसाने अचानक हजेरी लावली. या पावसामुळे श्ेतक-यांना दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामाला गती मिळाली आहे.

पारोळ्यात रिमझिम
शहर व परिसरात 25 दिवसांनंतर बुधवारी दुपारी 3.30 वाजता सुमारे तासभर रिमझिम पाऊस झाला. रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होता. बाजार समितीत उघड्यावरील मका, भुईमुगाचं काही प्रमाणात नुकसान झाले. तर शहरातील पीर दरवाजा, कजगाव रोड, रथगल्ली भागातील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.