आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा तडाखा : वीज काेसळून पाच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे/ नंदूरबार/ अमरावती - मुसळधार पावसात वीज काेसळून गुरुवारी राज्यात पाच जणांचा मृत्यू झाला. नंदूरबार व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी दाेघे व धुळे येथील एकाचा मृतांत समावेश अाहे.

शहादा तालुक्यातील राणीपूर (जि. नंदूरबार) येथील प्रकाश सर्जन पावरा यांच्या शेतात गुरुवारी कापूस लागवड करण्याचे काम सुरू होते. दुपारी अडीच वाजता अचानक मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू झाला. जाेरदार पावसानेही हजेरी लावली. याच वेळी वीज काेसळून शेतात काम करणारे गौरव हिम्मत पावरा (वय सात रा. राणीपूर) व नर्मदाबाई शांतीलाल पावरा (वय ३५ रा. मलगाव) हे दाेघे जागीच ठार झाले तर जायलीबाई सर्जन पावरा (वय ५५), जयवंतीबाई हिम्मत पावरा (वय ३०), कमलबाई साहण्या पावरा (वय ३२ सर्व रा. राणीपूर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वीज कडाडल्याने आजूबाजूच्या शेतातील मजुरांनी पळ काढला. तर धुळे जिल्ह्यातील वाघापूर शिवारात (ता. साक्री) वीज पडून गंगाराम दामू गोयकर (५०) यांचा मृत्यू झाला.

मोझरीत दाेघांचा मृत्यू
अमरावती - वीज काेसळून माेझरी येथे श्रीकृष्ण लक्ष्मण धुर्वे (४०) व गणेश झोलबाजी चांदेकर (४३) या दाेन शेतमजुरांचा मृत्यू झाला, तर सुदैवाने दाेघे बचावले. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.
बातम्या आणखी आहेत...