आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोपडा, धरणगाव, अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी; दोन ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अवघ्या आठवडाभरात तीन महिन्यांतील अनुशेष भरून काढणाऱ्या पावसाने सोमवारी जिल्ह्याला झोडपले. धरणगाव, अमळनेर आणि चोपड्यात गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली. कुऱ्हे येथे सर्वाधिक १०२ मीमी पावसाची नोंद झाली. तसेच पावसामुळे जिल्ह्यात दोन जणांचा बळी गेला.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वार्षिक सरासरी ४१ वरून ६८.७ टक्क्यांवर पाेहोचली अाहे. पावसामुळे नेरी येथील शुभम पाटील (वय १९) याच्या अंगावर भींत पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तसेच अमळनेर येथील राहुल पारधी (वय १९) याचाही घरात नाल्याचे पाणी गेल्यामुळे मृत्यू झाला.

धरणातील जलसाठा (%)
हतूनर-३३.९६, गिरणा- ३०.११, वाघूर- ६८.७१, मन्याड- ६.४३, बाेरी- ६७.३५, भाेकरबारी- २९.७५, सुकी- १००, अभाेरा- १००, अग्नावती- २०.६५, ताेंडापूर- २४.१, हिवरा- ६९.७४, मंगरूळ- १००, बहुळा- ६१.६२

अितवृष्टी म्हणजे काय?
२४तासांत ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर अितवृष्टी म्हटली जाते. धरणगावात ७०, अमळनेरात ७६.५ तर चाेपड्यात ७४.२८ मिलमिीटर पाऊस झाला. दरम्यान, येत्या २४ तासांतही अतिवृष्टीची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली अाहे.

२४ तासांतील पाऊस (मिमी)
जळगाव: ३९.१०
जामनेर : ३८.३७
एरंडाेल : ४३
धरणगाव : ७०
भुसावळ : ६१.८
यावल : १७.८०
रावेर : २८.८५
मुक्ताईनगर : २२
बाेदवड : ५९.६६
पाचाेरा : ४०
चाळीसगाव : ४१
भडगाव : २३.६०
अमळनेर : ७६.५०
पाराेळा : ३७.६०
चाेपडा : ७४.२८