आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिमझिम पावसामुळे नागरिकांची धांदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महिनाभरानंतर तुरळक हजेरी लावणाऱ्या पावसाने २५ जुुलैपासून अाठवडाभर पुन्हा दांडी मारली हाेती. मंगळवारी पहाटे वाजेपासून शहरात पावसाला प्रारंभ झाला. दिवसभर कुठे दमदार तर कुठे रिमझिम पाऊस सुरू हाेता. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली हाेती. दरम्यान, येत्या दाेन दिवस पावसाचे सातत्य राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला अाहे.

शहरात माेठ्या खंडानंतर सुरू झालेल्या जाेरदार पावसामुळे मंगळवारी जळगावकरांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी अाणि चाकरमानी यांना नाेकरीच्या ठिकाणी पाेहोचण्यात कसरत करावी लागली. तसेच अडगळीत पडलेल्या छत्र्या अाणि रेनकाेट पुन्हा बाहेर निघालेल्या दिसल्या. रिक्षावाल्या काकांनी पाऊस नसल्याने रिक्षाचे रेक्झिनच काढून ठेवले हाेते. त्यामुळे विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावे लागले. दुचाकीवर छत्री घेऊन वाहन चालवणाऱ्यांच्या छत्र्या उलट्या झाल्या तर काहींची वाहने घसली.

विद्यार्थ्यांनी घेतला मनसोक्त अानंद
विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा मनमुराद अानंद घेतला. शाळा सुटल्यानंतर पटांगणावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यात विद्यार्थी सवंगड्यांसाेबत मनसाेक्त उड्या मारताना दिसत हाेते.

मंगळवारी दुपारी वाढला वाऱ्याचा वेग
साेमवारचा रिमझिम पाऊस ५.८९ मिलिमीटरवर पाेहोचला. मंगळवारी पहाटे सुरू झालेला पाऊसदेखील सरासरी १० मिलिमीटरपर्यंत पाेहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे. जिल्ह्यात अातापर्यंत वार्षिक सरासरीच्या २५ टक्के पाऊस झाला अाहे. मंगळवारी दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने पाऊस थांबला हाेता. परंतु, संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला.