आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस रुसला अन् श्रावण हिरमुसला, पानाफुलांनी सजणारा निसर्ग यंदा मनासारखा बहरलाच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - श्रावणमास येताच ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ या कवितेच्या ओळी आपल्या ओठावर आल्यावाचून राहत नाही. यंदाचा श्रावणमास हा त्याला अपवाद ठरणार आहे. रविवार अर्थात 27 जुलैपासून श्रावणमास प्रारंभ होत आहे. पावसाने दीड महिना दडी मारल्याने सर्वत्र जमीन भकास दृष्टीस पडत होती. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने हिरवाईला सुरुवात झाली आहे.
पावसाची स्थिती
25 जुलै 2013 पर्यंत
25 जुलै 2014 पर्यंत
425.25
मिमी. सरासरी पाऊस
244.54
मिमी. सरासरी पाऊस
663.3 जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान