आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहरात पावसाचा शिडकावा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर परिसरात मागील सात दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पावसाचा हलका शिडकावा झाला. जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर ११ जूनपासून जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसाला पुन्हा सुरुवात झाली. शुक्रवार, शनिवार, रविवारी जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कायम होता. सोमवारी मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी रविवारीही पाऊस आल्याने ग्रामीण भागात खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत.

आतापर्यंत अवघ्या खरिपाच्या टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज असून शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्यादरम्यान शहरातील केडगाव, भिंगार, सावेडी, नागापूर या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आतापर्यंत जिल्हात सर्वाधिक १३६ मिलिमीटर पाऊस नगर तालुक्यात झाला आहे. त्याखालोखाल शेवगाव तालुक्यात ११३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. संगमनेर २०, अकोले ७६, नेवासे ४२, राहाता ७८, कोपरगाव ३६, पाथर्डी ३४, पारनेर ७९, कर्जत ८७, शेवगाव ११३ आिण श्रीगोंदे ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...