आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पावसाचा शिडकावा; वादळाने दोन वृक्ष कोसळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महापालिकेसमोरील जनता बँकेजवळ असलेले झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले.)
जळगाव- शहरात शनिवारी रविवारी मृग नक्षत्राच्या पावसाने दुपारी हजेरी लावली. तत्पूर्वी शनिवारी रात्री वाजेच्या सुमारास हलकासा शिडकाव झाला. दोन ठिकाणी दोन झाडे कोसळली. तसेच अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने सुयोग कॉलनीत उपकरणे जळाली. दिवसभर जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याने संध्याकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
शनिवारी रात्री हवेचा वेग वाढला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारालगत असलेला काशीद वृक्ष उन्मळून पडला. शनिवारी रात्री १० मिनिटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, तर रविवारी संध्याकाळी काही भागात शिडकाव झाला. तर अनेकांनी पावसाचे स्वागत केले.
सुयोग कॉलनीत वीज मीटर जळाले
वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. गिरणा टाकी परिसरातील सुयोग कॉलनीत वादळी वाऱ्याने तारा जोरजोरात हलून तुटून पडल्या. अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे काही घरांतील मीटर फ्रीज जळाले. क्रॉम्प्टनला वारंवार फोन करूनही कोणीही आले नसल्याने नागरिकांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात फोन करून आपली व्यथा मांडली.

नॅनो कारवर कोसळली फांदी
महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमोरील रायसोनी सायकल मार्टच्या शोरूमलगत वृक्षाची भलीमोठी फांदी खाली उभ्या असलेल्या नॅनो कारवर तुटून पडली. सुदैवाने कारमध्ये कोणी नव्हते.
या भागात खंडित होता वीजपुरवठा
कांचननगर, सुयोग कॉलनी, प्रेमनगर, भिकमचंदनगर, महाबळ कॉलनी, मोहननगर, दीक्षितवाडी, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील वीजपुरवठा रात्री चार तास खंडित होता. महामार्गावरील पथदिवेही बंद होते.