आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीने नुकसान; शिरपूर तालुक्यातील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खान्देशात शनिवारी पुन्हा अवकाळी पाऊस झाला. जळगाव, धुळे जिल्ह्यात काही भागांत गारपीट झाली. पावसामुळे कापलेल्या बाजरीचे पीक वाया गेल्याचे पाहून शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने अात्महत्या केली.
जळगाव शहरात वाजता ढगाळ वातावरण निर्माण झाले हाेते. रात्री वाजता धुवांधार वादळासह प्रत्यक्षात पाऊस सुरू झाला. मेहरूण परिसरातील महाजननगरात डीपी जळाली तर एक घरही पडले. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच हाेता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जळगाव-अाैरंगाबाद मार्गावरील चिंचाेली येथे वासुदेव सुकदेव घुगे यांच्या खळ्यात वीज पडली. यात खळ्यातील गुरांसाठीचा चारा, कडबा-कुट्टी जळून खाक झाली. कुसंुब्यासह एमअायडीसी परिसरातही दमदार पाऊस झाला. जामनेर, पाचाेरा या ठिकाणी पाऊस झाला.

चाळीसगाव, बोदवडला गारपीट
चाळीसगाव तालुक्यात अनेक ठिकाणी शनिवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्यासह गारपीट मुसळधार पाऊस झाला. रस्ते शेतांमध्ये गारांचा खच साचला होता. वादळाने २० ते २५ घरांवरील पत्रे उडाले. शेकडो झाडे उन्मळून पडली असून आंबा, लिंबू या फळबागांसह शेती पिकांचे नुकसान झाले. नांदगाव रस्त्यावरील गणेशपूर, हातगाव, अंधारी, माळशेवगे, चिंचखेडे या गावांमध्ये गारपीटतासभर झाली. बाेदवडला बाेरांच्या अाकाराची गार पडली. पाराेळ्यात विजांच्या कडकडाटासह सायंकाळी ७.४५ वाजता जाेरदार पाऊस झाला.
नंदुरबारमध्ये पाऊस
नंदुरबारशहरात शनिवारी सकाळी ढगांच्या गडगडाटासह १० मिनिटे पाऊस झाला. शहरात सकाळपासूनच ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. काही भागात पाऊस तर काही भागात गाराही पडल्याने शेतीचे नुकसान झाले.
येत्या ४८ तासांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पूर्व मध्य भारतात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रावरही दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मराठवाड्यात १४ एप्रिल आणि विदर्भ उर्वरित महाराष्ट्रात १५ एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे. १२ एप्रिल रोजी खान्देशात सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस दुपारनंतर गारपीट होण्याची शक्यता आहे.
धुळ्यात पुन्हा बरसला
धुळेसह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण हाेत होते. हीच स्थिती शनिवारी सकाळी होती. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. सुमारे १० ते १५ मिनिटे जाेरदार पाऊस झाला. शिरपूर तालुक्यातील अर्थे, तऱ्हाडी येथे सकाळी वाजेच्या सुमारास गारपीट झाली. साक्री तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. शहादा तालुक्यातील उत्तर भागात सकाळी तर दक्षिण भागात सायंकाळी लिंबूच्या आकाराच्या गारा पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. हिंगणी शिवारात हजारो पपईची रोपे उद्ध्वस्त झाली असून, काढणीला आलेला गहू, हरबरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिंदखेडा परिसरात शनिवारी पुन्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सुमारे २० मिनिटे वाऱ्याचे थैमान सुरू होते. त्यानंतर पाऊस झाला.

शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रूक येथील शेतकरी नरेंद्र चौधरी (२८) यांच्या शेतात बाजरी कापणी करून पडली होती. शनिवारी झालेली गारपीट पावसामुळे कापणी झालेली बाजरी पूर्णपणे भिजली. त्याचबरोबर टरबुजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे चौधरी यांना लाखो रुपयांचा फटका बसला. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी शेतातून घरी आल्यावर गळफास घेतला. त्यांच्यावर विकास कार्यकारी सोसायटीचे एक लाखाचे कर्ज आहे. त्याचबरोबर त्यांनी सोनेही गहाण ठेवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, आई, वडील असा परिवार आहे.
येत्या ४८ तासांत राज्यातील अनेक ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यंानी काढणीस अालेल्या पिकांची तोडणी करून विक्री करावी. डॉ.रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ