आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरासह परिसरात पाच महिन्यांत पाच खून; १२ दिवसांच्या अंतराने शहरात घडलेली दुसरी घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी सकाळी घटना उघड झाल्यानंतर नवीन हुडको कॉलनी परिसरातील मैदानावर घटनास्थळी जमलेली गर्दी. - Divya Marathi
मंगळवारी सकाळी घटना उघड झाल्यानंतर नवीन हुडको कॉलनी परिसरातील मैदानावर घटनास्थळी जमलेली गर्दी.
भुसावळ- सलग घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे शहर हादरले आहे. शहरातील प्रख्यात मल्ल माेहन बारसे यांचा जुलैला खून झाला होता. या घटनेनंतर १२ दिवसांत मंगळवारी (दि. १४)सकाळी पुन्हा एका तरुणाच्या खुनाची घटना उघडकीस आली. वाल्मीकनगरातील रहिवासी युवराज देविदास खरारे (वय २५) या तरुणाचा सोमवारी रात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात अाहे. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत शहरात घडलेली खुनाची ही पाचवी घटना आहे. दरम्यान, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
शहरासह परिसरात पाच महिन्यांत पाच खून; १२ दिवसांच्या अंतराने शहरात घडलेली दुसरी घटना
शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या पाच महिन्यांत खुनाच्या तब्बल पाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नसल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. जुलैला वाल्मीकनगर परिसरात माेहन बारसे यांचा भररस्त्यावर दिवसाढवळ्या खून झाल्यानंतर शहर हादरले होते. त्यानंतर १२ दिवसांच्या अंतराने पुन्हा त्याच परिसरातील रहिवासी तरुणाचा खून झाला. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. खूनप्रकरणी फिरोज शहा किरण बुधा सकत (रा.दोघे भुसावळ) यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले होते. चौकशीत दोघांनी खुनाची कबुली दिली असून सकत तृतीयपंथी असल्याचे पोलिसांनी सांिगतले.

आरोपींपैकी किरण सकत याने मृत तरुणाच्या पोटात चाकूने भोसकले. तर फिरोज शहा याने मृताचा चेहरा दगडाने ठेचला, अशी कबुली दोघांनी दिली. अनैसर्गिक कृत्याच्या लालसेतून ही घटना घडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. तत्पूर्वी नवीन हुडको कॉलनी परिसरात राजू लाेणारी यांच्या वीटभट्टीच्या परिसरातील मैदानावर, मंगळवारी सकाळी युवक क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. युवकांमुळेच ही घटना उघड झाली. घटनेबाबत शहर पाेलिसांना माहिती मिळताच डीवायएसपी राेहिदास पवार, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्यासह शहर बाजारपेठचे डीबी पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी परिसरात पाहणी केली. त्यानंतर युवकाचा मृतदेह पाेलिसांनी शहर ठाण्यात अाणला. घटनास्थळावरून फुटलेली बाटली, एक कॅरीबॅग आणि दगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दोघा अाराेपींना अटक केली असून, आणखी एक आरोपीचा प्रकरणात सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस योग्य दिशेने तपास करत आहेत. राेहिदासपवार, डीवायएसपी, भुसावळ

कायदा सुव्यवस्था धोक्यात : बारसेयांच्या खुनाच्या घटनेनंतर अवघ्या १२ दिवसांच्या अंतराने शहरात पुन्हा खून झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. गुन्हेगारांवर पाेलिसांचा धाकच उरला नसल्याचे हे द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात अाहे. खुनाच्या सत्रामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेऊन गुन्हेगारी वेळीच रोखण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे.

धुळ्यात शवविच्छेदन
शवविच्छेदनासाठीमृतदेह धुळे येथे नेण्यात अाला. मोहन बारसे यांच्या खून प्रकरणातील शवविच्छेदनाबाबत साशंकता निर्माण झाल्याने धुळे येथेच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तत्काळ हालचाली करून मृतदेह धुळ्याला हलवण्यात आला.

तपासाचे योग्य नियोजन
युवकाच्याखुनाची माहिती शहरात कळताच शहर पाेलिस ठाण्यासमाेर मोठा जमाव जमला होता. तसेच शहरातही विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, डीवायएसपी राेहिदास पवार, पोलिस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी तपासाचे नियाेजन केले. त्यानुसार मृत युवक सोमवारी रात्री कोणासोबत होता, याची माहिती काढण्यात आली. त्यानुसार किरण सकत फिरोज शहा या आरोपींना पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले होते.

चेहरा दगडाने ठेचला
आरोपीफिरोज शहाने मृताचा चेहरा दगडाने ठेचला होता. त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. मारेकऱ्यांनी खुनाचा पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यामुळे ओळख पटवण्यासाठी शहर पाेलिस ठाण्यात मृतदेह अाणण्यात आला. त्याठिकाणी मृताच्या नातेवाइकांनी ओळख पटवली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक दुचाकीही (क्रमांक-एम.एच.१९-पी.एस.५४६२) पाेलिसांनी घटनास्थळावरुन जप्त केली.

खुनाचा गुन्हा दाखल : एलसीबीचेनिरीक्षक प्रभाकर रायते यांनी दाेघा आरोपींची चाैकशी केली अाहे. खूनप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात चरण ग्यारसा खरारे यांच्या फिर्यादीवरून, खुनाचा गुन्हा दाखल झाला अाहे. पाेलिस निरीक्षक केदारे, सहा.फौजदार प्रकाश पाचपांडे, नितीन चव्हाण तपास करीत अाहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही पोलिस तपास करत आहेत.

खून प्रकरण चिंतेची बाब अाहे. त्यामुळे कठोर भूमिका घेणाऱ्या पाेलिस अधिकाऱ्यांची गरज अाहे. पावसाळी अधिवेशनात कायदा-सुव्यवस्थेबाबत लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न करत अाहे. संजय सावकारे, अामदार

खुनाच्या पाच घटना
३१मार्चला महामार्गावरील हॉटेल पालखीजवळ धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात बलरामसिंग प्रस्ते (वय ६०) या परप्रांतीय ज्येष्ठाचा खून झाला होता. त्यानंतर २० एप्रिलला हॉटेल सुरुचीजवळ कृष्णा दौंड या युवकाचा खून झाला. १६ मे रोजी तालुक्यातील खडका येथे अनिल सपकाळे (वय ४५) या बँक कर्मचाऱ्याचा पूर्ववैमनस्यातून खून झाला. त्यानंतर जुलैला मोहन बारसे खून प्रकरण घडले अाणि आता तर मंगळवारी पुन्हा युवराज खरारे या युवकाच्या खुनामुळे खळबळ उडाली .
बातम्या आणखी आहेत...