आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Criticize On Deputy Chief Minister Ajit Pawar

\'अजित पवारांना महाराष्‍ट्रातून \'मत\' नव्‍हे तर \'मूत\' मिळेल\'- राज ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राज्‍यातील जनतेला दुष्‍काळाच्‍या झळा बसत असताना खालच्‍या पातळीवर जाऊन बोलणा-या उपमुख्‍यमंत्र्यांना महाराष्‍ट्र निश्चितच जागा दाखवेल. यापुढे पवारांना राज्‍यात मत नाही तर फक्‍त मूत मिळेल, अशी जहरी टीका राज ठाकरे यांनी केली. महाराष्‍ट्र दौ-याच्‍या जळगाव येथील सांगता सभेत ते बोलत होते.


ठाणे इमारत दुर्घटनाही परप्रांतीयांमुळेच झाल्‍याचा दावा राज यांनी यावेळी केला. ते म्‍हणाले,' ठाण्‍यात इमारत बांधलेले दोघेही उत्तर प्रदेशचेच होते. ते दोघेही तिथे अनाधिकृत इमारती उभारायचे आणि उत्तर प्रदेशमधून लोकांना तिथे आणायचे. परवाच्‍या दुर्घटनेतील सर्वच्‍या सर्व लोक हे परप्रांतीय आहेत. त्‍यातील 80 टक्‍के मुसलमान तर 20 टक्‍के हे हिंदू होते.

महाराष्‍ट्रातील राज्‍यकर्ते आता हरलेले आहेत. जातीवरून लोकांमध्‍ये तेढ निर्माण करण्‍याचे ते काम करीत आहेत. आता ते मराठयांच्‍या आरक्षणाची मागणी करतायत. महाराष्‍ट्रातील प्रश्‍नाबद्दल कधी हे एकत्रित आले नाहीत. पण आरक्षणासाठी सर्व पक्षाचे लोक एकत्रित आले. जातीवरून हे नेते लोकांची माथी भडकवण्‍याचे काम करीत असल्‍याचे सांगत राज यांनी मराठा आरक्षणाला आपला विरोध असल्‍याचे सूचित केले.

मी मराठी मुलांबद्दल बोलतो म्‍हणून माझ्यावर केसेस दाखल केल्‍या आहेत. पण खरे गुन्‍हे केलेल्‍यांच्‍या केसेसचे काही झाले नाही. तिथे माझे काय होणार आहे. महाराष्‍ट्रातील मुलांना नोकरी लागली पाहिजे यासाठी बोलणे म्‍हणजे गुन्‍हा आहे काय असा सवालही त्‍यांनी विचारला.

राज ठाकरे यांनी यावेळी जळगावचे आमदार सुरेश जैन यांची नक्‍कलही केली.