आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakare Visiting Jalgaon : MNS Three MLA Today In City

राज ठाकरे यांचा जळगाव दौरा : मनसेचे तीन आमदार आज शहरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी जळगावात सभा होत आहे. जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांकडून नियोजन सुरू असून त्याची पाहणी करण्यासाठी तीन आमदार शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होत आहेत. राज्याचे पदाधिकारी येत असल्याने त्यांच्या व्यवस्थेसाठी शहरातील हॉटेल व लॉजदेखील बुकिंग केली जात आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभांचा धडाका सुरू करत राज ठाकरे यांनी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. नंदुरबार व धुळ्यानंतर ठाकरे रविवारी जळगावात सभा घेत आहेत. यानिमित्ताने ते शनिवारी दाखल होत आहेत. सागर पार्क येथे आयोजित सभेची तयारी वेगात सुरू आहे. नियोजनाच्या दृष्टीने काहीही अडचणी येऊ नयेत म्हणून आमदार बाळा नांदगावकर हे गुरूवारी रात्री तर शुक्रवारी सकाळी आमदार नितीन सरदेसाई व आमदार शिशिर शिंदे हे दुपारी जळगावात येत आहेत. सोबत शिरीष सावंत देखील राहणार आहेत. ते सायंकाळी सागर पार्क येथे व्यासपीठाची पाहणी करून प्रकाश, बैठक व्यवस्थेची पाहणी करतील. तसेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता पदाधिकार्‍यांची बैठक होईल, असे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी सांगितले.


एक लाखाचा अंदाज
राज ठाकरेंच्या सभेस आजपर्यंत झालेली गर्दी लक्षात घेता जळगावातही रेकॉर्ड ब्रेक सभा घेण्याची तयारी सुरू आहे. सागर पार्कवर सुमारे एक लाखाच्या उपस्थितीचा अंदाज पदाधिकार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे.


ठाकरेंचा मुक्काम हॉटेलात
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी मुक्कामाची व्यवस्था महाबळ रोडवरील हॉटेल रॉयल पॅलेस येथे करण्यात आली आहे. तसेच आमदारांसाठी सिल्व्हर पॅलेस, हॉटेल कोझी कॉटेज, मैत्रेयाज्, मिनर्वा आदी ठिकाणी करण्यात आली आहे. काही पदाधिकार्‍यांसाठी लॉजमध्येदेखील व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे.