आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजा मयूर पुन्हा कारागृहात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी घरकुल घोट्याळ्यातील संशयित आरोपी राजा मयूर यांचा तात्पुरता जामीनअर्ज फेटाळून लावत कारागृहात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मयूर शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता जळगाव कारागृहात दाखल झाले. ते 3 महिन्यांपासून जामिनावर बाहेर होते.

खंडपीठात शपथपत्र सादर
आमदार सुरेश जैन, जगन्नाथ वाणी आणि राजा मयूर यांच्या जामीनअर्जांवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या 350 पानी शपथपत्रासह या तिन्ही संशयितांचे जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळले आहेत. ते जामीन फेटाळल्याच्या आदेशांच्या प्रती शुक्रवारी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी खंडपीठात सादर केले.

संशयितांच्या जामीन अर्जांवर सोमवारी खंडपीठात अँड.चव्हाण यांचा युक्तिवाद होणार आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा न्यायालयात साक्षीदारांना समन्स काढण्याचा अर्ज सादर करण्यात आला आहे. हे अर्ज प्रलंबित राहत आहेत, या अर्जावर कामकाज होत नसल्याचे खंडपीठाच्या लक्षात आले आहे.