आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राजधानी एक्स्प्रेस’ लवकरच भुसावळ विभागातून धावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - दाेनमहिन्यांपूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या अखिल अग्रवाल यांचे साेमवारी सकाळी महानगरी एक्स्प्रेसने भुसावळ जंक्शनवर प्रथमच आगमन झाले.
आरपीएफची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी १० वाजेच्या सुमारास रेल्वेच्या विविध कार्यालयांना भेटी देत नवीन पादचारी पुलाच्या कामाचा आढावा घेतला. केला सायडिंगकडील तिकीट खिडकी तसेच विद्युत इंजिन कारखाना, एमअाेएच रेल्वे यार्डात पाहणी केली. रेल्वेस्थानकावरील इंडिकेटर्स, आरपीएफ कार्यालयातील सीसीटीव्हींबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. प्लॅटफाॅर्म चारवरील प्रतीक्षालयातील सुविधांचीदेखील महाव्यवस्थापकांनी पाहणी केली. तसेच बंद कार्यालये उघडून त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, या वेळी लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. त्यात भुसावळ-पुणे एक्स्प्रेसला दिवाळीच्या कालावधीत दोन अतिरिक्त स्लिपर कोच आणि नागपूर-पुणे हॉलिडे एक्स्प्रेस सुरू करण्याच्या मागणीवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समोर आले.

आयओडब्ल्यू विभागाच्या अधिकाऱ्यांना केले पाचारण
गळती रोखण्याची सूचना : रेल्वेस्थानकावरीलनळांना असलेली गळती त्वरित रोखण्याची सूचना महाव्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांना केली. अायअाेडब्ल्यू विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पाचारण करून कार्यवाही करण्यास त्यांनी सांगितले. नवीन पादचारी पुलाच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

बालकांबाबत माहिती दिली : वर्षभरातरेल्वेस्थानकावर किती बेवारस बालके आढळली? किती बालकांना पालकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले? याची माहिती महाव्यवस्थापकांना आरपीएफ आयुक्त आर.एन.सरकाटे, निरीक्षक विनोदकुमार लांजीवार, उपनिरीक्षक जयश्री पाटील यांनी दिली.

लोकप्रतिनिधींची भेट : माजीमहसूलमंत्री एकनाथ खडसे खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेस्थानकावर येऊन महाव्यवस्थापकांशी चर्चा केली. व्हीआयपी कक्षात झालेल्या बैठकीस डीआरएम सुधीरकुमार गुप्ता उपस्थित होते. त्यानंतर महाव्यवस्थापक अग्रवाल यांनी डीआरएम कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
रेल्वेस्थानकावरील सोई-सुविधांची केली पाहणी
सर्व रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना दर्जेदार सोई-सुविधा देण्यावर भर आहे. लवकरच भुसावळ विभागातून १३० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वेगाड्या धावतील. एवढेच नव्हे, तर भविष्यात राजधानी एक्स्प्रेसही भुसावळ विभागातून धावू शकेल. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी दिली. सोमवारी भुसावळ स्थानकाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बातम्या आणखी आहेत...