आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपायुक्त लाच प्रकरणात अायुक्तांची चाैकशी, फातलेंच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लाचखाेर उपायुक्त राजेंद्र फातले यांच्या निलंबनासाठी नगरविकास विभागाकडे अहवाल पाठवण्यात अाला अाहे. याप्रकरणात साेमवारी लाचलुचपत विभागाने महापालिका अायुक्त कर्मचाऱ्यांची तासभर चाैकशी केली. तत्कालीन अायुक्त उपायुक्तांनाही चौकशीसाठी बोलावण्यात अाले अाहे.
महासभेचा अवमान केल्याप्रकरणी निलंबित करण्यात अालेल्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांना तत्कालीन अायुक्तांच्या आदेशावरून सेवेत रुजू करण्यासाठी उपायुक्त फातले यांनी ५० हजारांची लाच मागितली हाेती. अाॅक्टाेबर राेजी त्यांना रंगेहात पकडण्यात अाले हाेते. यात त्यांना दाेन दिवसांची पोलिस काेठडीदेखील मिळाली हाेती. सध्या फातले जामिनावर मुक्त झाले अाहेत. गेल्या आठवड्यात फातले मनपात रुजू हाेण्याची चर्चा सुरू झाली हाेती. त्याला अायुक्त जीवन साेनवणे यांनीदेखील दुजोरा दिला हाेता. परंतु कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून चुकीची माहिती अाल्याचा खुलासा साेनवणेंनी साेमवारी केला अाहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मनपाकडे फातलेंसंदर्भात ११ मुद्द्यांवर माहिती मागवली हाेती. ती माहिती देण्यासाठी फातले महापालिकेत अाले हाेते. परंतु, त्यांनी पदभार घेतला नसून काेणत्याही प्रकारचे काम केले नसल्याचे अायुक्तांनी स्पष्टीकरण दिले अाहे.

महापालिकेनेदिला अहवाल
लाचलुचपत विभागाने मागितलेल्या ११ मुद्द्यांच्या अाधारे महापालिकेनेही नगरविकास विभागाला अहवाल पाठवला अाहे. त्यात पुढील कारवाई करण्यासंदर्भात कळवले अाहे.

अायुक्तांचीही झाली चाैकशी
उपअधीक्षक पराग साेनवणे यांनी अायुक्त अभियंत्याच्या फाइलशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना साेमवारी चाैकशीसाठी बाेलावले हाेते. दुपारी ते यावेळेत तब्बल एक तास अायुक्तांची चाैकशी करण्यात अाली. या वेळी त्यांनी निलंबित अभियंते फाइल या विषयावर माहिती दिली. याच प्रकरणात तत्कालीन अायुक्त संजय कापडणीस उपायुक्त प्रदीप जगताप यांनाही चाैकशीसाठी बाेलावण्यात अाले अाहे. ते बाहेरगावी असल्याने केव्हा जळगावात येतात याकडे लक्ष लागून अाहे.

एसीबीने दुसऱ्याच, दिवशी दिला अहवाल
फातलेंना अाॅक्टाेबर राेजी अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अाॅक्टाेबर राेजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल पाठवला हाेता. त्यानंतर राेजी महापालिकेच्या अायुक्तांनाही अहवाल दिला अाहे. त्यानंतर पुन्हा १५ राेजी अहवाल पाठवण्यात अाला अाहे. फातलेंच्या ४८ तासांच्या अटकेनंतर त्यांच्या निलंबनाचे अधिकृत अादेश दाेन दिवसांत निघण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...