आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय-प्रशासकीय कोंडीमुळे महापालिका उपायुक्तांचा ‘गेम’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राजकीय साठमारी,वर्षभरापासून होणाऱ्या प्रशासकीय कोंडीमुळेच मनपा उपायुक्त राजेंद्र फातले यांचा गेम करण्यात आला, असे आता स्पष्ट झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी नगररचनातील निलंबित सहा अभियंत्यांना पुन्हा रुजू करून घेण्याचे लेखी आदेश दिले होते.त्यानंतर वारंवार पालिकेत खेटे घालूनही प्रशासनाने दाद दिली नाही; हे कमी म्हणून की काय, फेरनियुक्ती करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यानेच लाच मागितल्यामुळे तक्रारदाराचा संयम सुटला आणि उपायुक्त फातले यांना बुधवारी ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. फातले प्रकरणामुळे राजकीय इशाऱ्यावर चालणारा १७ मजलीचा प्रशासकीय कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, फातलेंच्या जागी गुरुवारी आस्थापना आणि लेखा विभागाच्या प्रभारी उपायुक्तपदी लक्ष्मीकांत कहार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जळगाव महापालिकेतील क्रमांक दोनचा अधिकाऱ्यास लाच घेताना अटक झाल्यामुळे राज्यभरात खळबळउडाली आहे. फातलेंविरोधात यापूर्वीही मालेगाव पालिकेत तक्रारी होत्या, असे सांगण्यात येते. मात्र, जळगावात पदभार घेऊन इनमीन तीनच महिने झालेल्या फातलेंचा गेम कशामुळे झाला याचा ‘दिव्य मराठी’ने मागोवा घेतला असता पालिकेतील राजकीय साठमारी आणि या राजकारणाचा लाभ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उचलल्याचे यामागे प्रमुख कारण असल्याचे समोर आले असून त्यामुळेच पालिकेतील अधिकाऱ्यांनी आपल्या सहा सहकाऱ्यांना रुजू करून घेण्यासाठी वर्षभर कागदी घोडे नाचवल्याचे स्पष्ट झाले.

काय घडले वर्षभरात
नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्यावर आरोप करीत महासभेने निकम यांना निलंबित करून बडतर्फ करण्याचा ठराव गतवर्षी केला होता. मात्र, निकम यांची नियुक्त राज्य शासनाकडून झाल्यामुळे तत्कालीन आयुक्तांना तो ठराव शासनाकडे पाठवणे भाग होते. या दरम्यान, आपले वरिष्ठ अधिकारी निकम यांना वाचवण्यासाठी नगररचना विभागातील सहा अभियंत्यांनी आयुक्तांना पत्र दिले होते. हे गोपनीय पत्र फुटले आणि त्यावरून महासभेत रणकंदन झाले. पत्र देणाऱ्या सहा अभियंत्यांवर सभागृहाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला. या सहा अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. अभियंत्यांनी माफी मागितली. तरीही दोषारोपपत्र ठेवून अभियंत्यांकडून खुलासा मागवण्यात आला.

पाच महिन्यांचा कालावधी ठरला कारणीभूत...
सहा अभियंत्यांनी खुलासा केला. हा खुलासा महापालिकेचे तत्कालीन अायुक्त संजय कापडणीस यांनी २० मे राेजी मान्य केला आणि त्यांना सक्त ताकीद देऊन कामावर घेण्याचे अादेश निर्गमित करावेत, अशी सूचना केली. उपायुक्तांनी संबंधितांना पाेस्टिंग द्यावी, असे अादेशही दिले. परंतु, अादेश देणाऱ्या अधिकाऱ्याची जून महिन्यात बदली झाली. त्यानंतर रुजू झालेल्या अधिकाऱ्याने यात काेणतीही हालचाल करता उलट अाधीच त्रस्त असलेल्या अधिकाऱ्यांची अधिकच कोंडी केली.

निवेदनांना मिळाली केराची टाेपली...
अायुक्त कापडणीस यांनी केलेल्या अादेशानंतर तातडीने रुजू करून घेण्याचे काम उपायुक्तांनी करणे अपेक्षित हाेते. परंतु, प्रशासनातील लालफितीचा अनुभव या अधिकाऱ्यांनाही अाला. २९ अाॅगस्ट २०१६ २१ सप्टेंबर २०१६ या दाेन निवेदनानंतरही उपायुक्तांनी नियुक्तीची फाइलवर कारवाई केली नाही. भेटी घेतल्यानंतर बदल्याच्या अपेक्षांचं अोझं लादण्याचा प्रयत्न केला. नियमानुसार काम हाेत नसल्यानेच अखेर फातलेंवर कारवाई करण्याचा निश्चय पक्का करण्यात आला. त्यानुसार बुधवारी सापळा लावला त्यात फातले अडकले.
...असा अाहे घटनाक्रम
१३ अाॅक्टाेबर २०१५ - सहा अभियंत्यांचे निलंबन.
मे २०१६ - खुलासा मागवला.
मे २०१६ - याच दिवशी चाैकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात अाली.
१३ मे २०१६ - सहा अभियंत्यांनी खुलासा सादर केला.
१६ मे २०१६ - अास्थापना विभागात टिपणी तयार केली.
२० मे २०१६ - अास्थापना अधीक्षकांनी टिपणी सादर केली.
२० मे २०१६ - अायुक्तांनी कामावर घेण्याचे अादेश उपायुक्तांना केले.
१६ जून २०१६ - राेजी अायुक्त कापडणीस यांची बदली.
२९ अाॅगस्ट २०१६ - सहा अभियंत्यांनी सेवेत नेमणूक करण्याचे निवेदन दिले.
२१ सप्टेंबर २०१६ - पुन्हा सेवेत नेमणूक करण्यासाठी निवेदन.
अाॅक्टाेबर २०१६ - उपायुक्त फातलेंची भेट.
अाॅक्टाेबर २०१६ - उपायुक्त फातलेंना लाच घेताना अटक.
अाॅक्टाेबर २०१६ - फातलेंना न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

फाइल तपासून सहा जणांचा निर्णय
^निलंबित सहाजणांच्या फाइलमध्ये काय टिपणी लिहिली अाहे, हे माहिती नाही. चौकशीसाठी ती फाइल पोलिसांनी ताब्यात घेतली अाहे. त्यामुळे त्यातील अधिकाऱ्यांनी काय म्हटले अाहे, हे तपासून कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत निर्णय घेता येईल. जीवनसाेनवणे, अायुक्त
भाेसलेंनी घेतली

मनपा अायुक्तांची भेट
निलंबनाची कारवाई झालेल्या सहा अभियंत्यांपैकी एक असलेले अरविंद भाेसलेंनी गुरुवारी अायुक्तींची भेट घेतली. या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेण्याबाबत चर्चा केल्याच्या वृत्ताला अायुक्तांनी दुजोरा दिला. फाइल अाल्यानंतर त्यावर निर्णय घेऊ, असेही अायुक्तांनी त्यांना सांगितले.

कोण आहे कर्ता धर्ता? : अभियंतानिलंबित प्रकरणापूर्वी तत्कालीन अायुक्त सत्ताधारी यांच्यात वाजले हाेते. त्यात महासभेत नगररचनाचे सहायक संचालकांविरुद्ध घेतलेल्या निर्णयाला अाव्हान देण्याचा विषय सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागला हाेता. कापडणीसांनी कामावर घेण्याचे अादेश दिल्यानंतरही त्यावर कार्यवाही हाेत नसल्याने यात राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरू झाली हाेती. कोणताही अार्थिक गैरव्यवहार कामामध्ये अनियमितता नसूनही केवळ वरिष्ठांची पाठराखण केल्याची शिक्षा म्हणून अभियंत्यांवर कारवाई झाली होती.

बातम्या आणखी आहेत...