जळगाव - जिल्ह्याचेनवे पालक सचिव म्हणून राज्याच्या स्वच्छता पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मीणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालक सचिव मंत्रालयाने नव्या अद्यादेशाद्वारे जाहीर केले. राजेशकुमार यांनी जळगाव जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. यासह धुळे जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून महसूल मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज तसेच नाशिकचे पालक सचिव म्हणून पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता यांची नियुक्ती झाली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिली.