आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित झाल्यास ‘जोडे मारो’, ‘पुतळा दहन’ आंदोलन, राजपूत समाजाची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - टीअारपी वाढवण्यासाठी सतत ऐतिहासिक व्यक्तींच्या इतिहासात काल्पनिक प्रसंग घुसळवून प्रसारण करणाऱ्या विकृत सिने दिग्दर्शकाचा जाहिर निषेध करून ‘राणी पद्मावती’ या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदीसाठी विविध पातळीवर लढा देण्याचा निर्धार जिल्हा राजपूत समाज बांधवांनी केला अाहे. रविवारी दुपारी महाराणा प्रताप पुतळ्याजवळील हाॅलमध्ये इतिहास सत्यता पडताळणी समितीची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात अाला.
 
पद्मावती चित्रपट विराेधासाठी जमलेल्या बैठकीसाठी डाॅ. जी. एन. पाटील, अॅड. अार. बी. पवार, चंद्रसिंग पाटील, प्रा. रामचंद्र पाटील, एन. टी. पाटील, चंद्रशेखर राजपूत, अाशिषसिंह हाडा, समाधान महाजन, विनाेद शिंदे, बापूराव साळुंके, महेंद्रसिंग पाटील, रमाकांत राजपूत, पूनमचंद पाटील, बाबुलाल पाटील, सुरेशसिंह राजपूत यांच्यासह जिल्हाभरातून विविध कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती. बैठकीच्या सुरुवातीला राणी पद्मावतींचा इतिहास चित्रपटातील अाक्षेपार्ह दृष्य, संदर्भ याबाबत सत्यता पडताळणी समितीने नाेंदवलेली निरिक्षणे मांडण्यात अालीत.
 
या वेळी संजय लिला भंन्साळी या दिग्दर्शकाने अातापर्यंत जाेधा-अकबर, बाजीराव-मस्तानी या चित्रपटातून ऐतिहासिक पात्रांच्या इतिहासाशी छेडखानी केली असल्याचे मत मांडण्यात अाले. चित्रपटाच्या प्राेमाेमध्ये राणी पद्मावतीचे पात्र करणाऱ्या अभिनेत्रीने केलेला पेहराव हा राजपूत समाजातील राणीचा नाही. तर राणीला नृत्य करताना दाखवले अाहे. अशी काेणतीही कुलवान स्त्री पुरुषांसमाेर नृत्य करत नाही. खिलजीला मुख दर्शन, हा संदर्भ देखील इतिहासाशी केलेली छेडखानीचा विषय अाहे, प्रा. पाटील सांगितले.
 
अांदाेलनाची ठरवली दिशा
याचित्रपटाबाबत राजपूत समाजाचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांना भेटले हाेते. त्यावेळी इतिहास पडताळणी समिती नेमण्यात अाली अाहे. या समितीचा अहवाल अाल्यानंतर नाेव्हेंबरला त्यावर निर्णय हाेणार अाहे. हा चित्रपट प्रसारीत हाेवूच नये, यासाठी सर्वपक्षीय सर्वधर्मीयांचा सहभाग घेऊन लढा उभारण्याचे ठरवण्यात अाले. जर हा चित्रपट प्रसारित झालाच तर त्याच्या विराेधात किमान एक हजार जणांचा मूक माेर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, धरणे अांदाेलन करणे. जिल्ह्यात तरी हा चित्रपट प्रसारित हाेवू नये यासाठी जिल्ह्यातील चित्रपटगृह चालकांना निवेदन देणे. दिग्दर्शकाचा जाहिर निषेध करण्यासाठी जाेडाे माराे अांदाेलन करणे अादी अांदाेलनांची दिशा या वेळी ठरवण्यात अाली.
 
वकिलांची समिती तयार करणार
यासंदर्भात न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढता यावी, यासाठी शहरातील समाजातील ते वकिलांची समिती तयार करण्यात येणार अाहे. तर हा चित्रपटात चुकीच्या माहिती दृश्यांसह प्रसारित झालाच तर त्याला कडाडून विराेध करण्यासाठी युवा संघटना अापली भूमिका पार पाडेल. त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही देण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...