आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज यांचा खान्देश दौरा : सभा ऐकण्‍यासाठी गच्ची, झाडे अन् वीज टॉवरवरही गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावातील आकाराने सर्वात मोठय़ा असलेल्या सागर पार्कवर रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. गच्ची, झाडे अन् वीज टॉवरवर प्रचंड गर्दी जमली होती. यामुळे यापूर्वी राजकीय पक्षांच्या पार पडलेल्या सभांमधील गर्दीसोबत तुलना होऊ लागली आहे. पोलिस प्रशासनाच्या मतानुसार हा आकडा 50 हजाराच्या घरात आहे तर विरोधक 40 हजारांची उपस्थिती सांगत आहेत. मनसेच्या पदाधिकार्‍यांकडून मात्र सव्वा लाख गर्दीचा दावा केला जात आहे.

आठवडाभरापासून मनसेच्यावतीने सुरू असलेली तयारी, कार्यकर्त्यांमार्फत झालेल्या प्रसिद्धीचा फायदा अखेर रविवारच्या सभेत दिसून आला. महाराष्ट्र दौर्‍यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जळगावातील सभेने दौर्‍याची सांगता झाली. यानिमित्ताने गर्दीचा उच्चांक गाठला जाईल, असे मनसे पदाधिकार्‍यांकडून सांगितले जात होते. त्याची प्रचिती राज ठाकरे यांच्या सभेच्यानिमित्ताने आली. दुपारी 5 वाजेची वेळ असली तरी वाढत्या तापमानाने सभेला प्रत्यक्षात 6 वाजता सुरुवात झाली. त्यापूर्वी दुपारी चार वाजेपासूनच खान्देशातून कार्यकर्ते जळगावात दाखल होऊ लागले होते. त्यामुळे मैदान र्शोत्यांच्या उपस्थितीने खच्चून भरले होते. तसेच आकाशवाणी चौकाकडून हॉटेल रॉयल पॅलेसपर्यंतचा रस्ताही भरला होता. मैदानाच्या आजूबाजूच्या अपार्टमेंट व घरांच्या गच्चीवर गर्दी झाल्याने राज ठाकरेंना चारही बाजूने फिरत चाहत्यांना अभिवादन करावे लागले.


आपल्याला शॉक घ्यायचा नाही, द्यायचा आहे
राज यांनी भाषणाला सुरूवात केल्यानंतर सुरुवातीचा काही काळ त्यांना नेहमीचा सूर गवसत नव्हता. ते अस्वस्थ वाटत होते. व्यासपीठासमोरील हुल्लडबाज तरुणांना तसेच वाहिन्यांच्या कॅमेरामनलाही त्यांनी समज दिली. त्यानंतर वीज टॉवरवर चढलेल्या तरुणांना पाहून ते म्हणाले, पोलवर उभे राहू नका. शॉक लागेल. आपल्याला शॉक घ्यायचा नाही, तर शॉक द्यायचा आहे.


मनसेची काठी हा आधार
सभेच्या गर्दीत एक आजीबाई मनसेचा झेंड्याचा टेकू घेऊन व्यासपीठाकडे जात होत्या. त्यांना पाहताच राज ठाकरे म्हणाले, आमच्या आजीबाईंना आधाराला मनसेचीच काठी लागली. महाराष्ट्रातला आधार देणारी हीच काठी आहे. मात्र, या काही कुबड्या नाहीत. हाणण्यासाठीही मनसेचीच काठी लागेल!


यापूर्वी गाजलेल्या सभा
1,25,000
राजीव गांधी निमखेडी, 1984
25,000
राजीव गांधी जी.एस. मैदान,1986
25,000
नरेंद्र मोदी जी.एस. मैदान, 2000
35,000
पांडुरंग शास्त्री, एमआयडीसी,2006
50,000
र्शीर्शी रविशंकर पोलिस कवायत मैदान,2009
30,000
राजनाथसिंग जी.एस. मैदान,2010
35,000


अमरावतीनंतर जळगाव
पोलिसांच्या दृष्टीने मैदानाची क्षमता 20 ते 22 हजार आहे. मनसेच्या पदाधिकार्‍यांकडून जळगाव शहरात आजपर्यंत झालेल्या सभांमधील गर्दीचा हा उच्चांक असल्याचा दावा केला जात आहे. अमरावतीत झालेल्या सभेनंतर सर्वात जास्त गर्दी जळगावात झाली असल्याचा दावा मनसे जिल्हा संपर्क प्रमुख विनय भोईटे यांनी केला.