आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकळत चोरांसाठी मते मागण्याचे पाप आमच्या हातून घडले: राजू शेट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यातील कष्टकरी, शेतकऱ्यांकडे जाऊन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोंदी यांच्यासाठी मते मागितली. तीन वर्ष संयम बाळगल्यानंतर आपण चोरांसाठी मते मागितले असल्याचे लक्षात आले आणि आम्ही एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सन २०१९ च्या निवडणुकीनंतर मोदी पुन्हा लाल किल्ल्यावर दिसू नयेत म्हणून नव्या लढ्याला प्रारंभ करणार आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी दिल्लीत मोदी सरकारविरोधात १७० शेतकरी संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती हमीभाव परिषदेत ते बोलत होते. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक आणि परिषद मंगळवारी जळगावात झाली. या परिषदेला शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, आमदार बच्चू कडू, डॉ.बाबा आढाव, डॉ.अजित नवले, सुशीलाबाई मोराळे, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एनडीए सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु चुकीच्या लोकांसोबत राहण्याची मानसिकता नाही. 

ज्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, खोटी आश्वासने दिली. त्यांच्यासोबत राहण्यात स्वारस्स नाही. नकळत मी मोंदीसाठी मते मागण्याचे पाप केले आहे. या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी पुण्यात महात्मा फुले यांची माफी मागून मी पुणे ते मुंबई पायी प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वातील सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. परंतू आता पीक कोणते आणि पीकातील तण कोणते हे लक्षात आले आहे. नोटबंदीसारख्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचा जीडीपीए खाली आला असून अडीच लाख कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप खासदार शेट्टी यांनी केला. मोदी सरकारविरोधात येत्या २० नोव्हेंबर रोजी रामलिला मैदानावर देशभरातील १७० शेतकरी संघटनांना सोबत घेवून आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 

20 आॅक्टोबर, 8 नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन 
- येत्या २० आॅक्टोबर रोजी बलिप्रतिपदा असून या दिवशी प्रत्येक गावात बळीराजाची मिरवणूक काढून त्या-त्या भागातील पोलिस ठाण्यांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. 
- नोव्हेंबर रोजी नोटबंदीच्या निर्णयाचे वर्ष श्राद्ध घातले जाणार आहे. 
- पोलिसठाण्यात जाऊन भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात खून, आत्महत्येस प्रवृत्त आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. पोलिसांनी फिर्याद घेतल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येतील. 
- शेतकरी कर्जमुक्ती हमीभाव मिळावा. हे ठराव पारित करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...