आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल गौरवणार उत्कृष्ट कॉलेज, प्राचार्य, शिक्षकांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, अधिकारी व कर्मचाºयांना राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे बुधवारी पुरस्काराची यादी जाहीर करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते गौरव पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. रौप्यमहोत्सवी वाटिकेचे उद्घाटन, डिजीटल नॉलेज सेंटरचे उद्घाटन, कर्मचारी भवनाच्या कोनशिलेचे अनावरण आदी कार्यक्रमांना राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री संजय सावकारेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
सकाळी 11 वाजता दीक्षांत सभागृहात कार्यक्रम सुरू होणार आहे. उत्कृष्ट महाविद्यालय- जी.टी.पी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार, उत्कृष्ट प्राचार्य- डॉ.इक्बाल मजिद शाह, एच.जे. थिम महाविद्यालय, जळगाव, एम.एन. श्रीकुमार केंद्रीय विद्यालय विद्यापीठ, उत्कृष्ट शिक्षक- डॉ.अंबरसिंग राजपूत, झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे, प्रा.आर.डी.कुळकर्णी यू.आय.सी.टी. उमवि, उत्कृष्ट अधिकारी -वाय.डी. वाघमारे उपकुल सचिव, मुनाफ मन्सुर शेख, कक्ष अधिकारी उमवि, उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी जितेंद्र एन.गोहिल, लघुलेखक, उमवि, अनिल वाणी परीक्षा विभाग उमवि, मंगला लोणे, परिचारिका उमवि, शालिनी मोरे वित्त विभाग उमवि. कमलाकर सोनार जनसंपर्क विभाग, सुनील आढाव उमवि, रामभाऊ पाटील विधी महाविद्यालय नंदुरबार, विष्णू पाटील घोगरे महाविद्यालय धुळे. विशेष उल्लेखनीय पुरस्कार- सुनील कोल्हे, राजेंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, राजाराम कोळी, सचिन बाविस्कर, लक्ष्मण पाटील, मनीषा महाजन उमवि.
राज्यपालांचा दौरा कार्यक्रम
असा आहे दौरा गुरूवारी सकाळी

10.50 वाजता राज्यपाल शंकरनारायअसा आहे दौरा गुरूवारी सकाळी 10.50 वाजता राज्यपाल शंकरनारायण्न यांचे जळगाव विमानतळावर आगमन, 11.15 वाजता विद्यापीठात आगमन, 11.30 वाजता विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थिती, 12.55 ते 1.15 यावेळेत संचालक, विभागप्रमुख व प्राध्यापकांशी चर्चा, दुपारी 2.10 वाजता विमानतळाकडे प्रयाण करतील.