आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rakhi Sawant News In Marathi, RPI, Divya Marathi, Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरपीआयचा ‘कालचा गोंधळ बराच होता’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विधानसभानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह लपून राहिला नाही. नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा तास उशिरा पोहचलेले राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंच्या पत्रकार परिषदेपाठोपाठ जाहीर मेळाव्यात अॅटम गर्ल तथा अभिनेत्री राखी सावंतच्या एका झलकसाठी कार्यकर्त्यांनी चांगलाच धुडगूस घातला. त्यामुळे मेळावा अवघ्या ४० मिनिटांत उरकावा लागला. अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या वागणुकीमुळे आरपीअायचा ‘कालचा गोंधळ बराच होता’ असेच म्हणावे लागेल.

आरपीआयचा उत्तर महाराष्ट्र मेळावा सोमवारी दुपारी १२ वाजता लेवा समाज सभागृहात झाला. याप्रसंगी आरपीआयमध्ये नुकताच प्रवेश केलेली अॅटम गर्ल राखी सावंत िहची उपस्थिती सर्वांसाठी अाकर्षण ठरणार होते. परंतु नियोजित वेळेपेक्षा खासदार रामदास आठवले राखी सावंत तब्बल सहा तास उशिराने जळगावात दाखल झाले. दुपारपासून ताटकळत असलेल्या कार्यकर्त्यांना दोघेही हॉटेलमध्ये उतरल्याचे कळताच शेकडाेने कार्यकर्ते दाखल झाले. या वेळी पत्रकार परिषदेत अाठवलेंसह राखी दाखल होताच कार्यकर्त्यांनी एकमेकांची पर्वा करता राखीच्या एका झलकसाठी धक्काबुक्की केल्यामुळे पत्रकार परिषदही दाेन टप्प्यात घ्यावी लागली. त्यानंतर मेळाव्यासाठी सायंकाळी वाजता कार्यक्रमस्थळी पाेहचलेल्या राखीच्या सत्कारासाठीही कार्यकर्त्यांनी रीघ लावली होती.

नेते व्यासपीठावरून शिस्तीने वागण्याचे अावाहन करत असताना कार्यकर्ते मात्र खुर्च्यांवर उभे राहून शिट्ट्या घाेषणा देण्यात दंग होते. मिळेल त्या जागेवर चढत राखीला पाहण्याची उत्कंठा क्षणोक्षणी दिसून अाली, त्यामुळे अाधीच उिशरा सुरू झालेला कार्यक्रम अवघ्या ४० मिनिटांत आटोपता घ्यावा लागला. आरपीआय कार्यकर्त्यांच्या गोंधळाचे एकमेव कारण ठरली ती अभिनेत्री राखी सावंत. व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्यासह प्रदेश उत्तर महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.

राखीने दिला गंभीर होण्याचा सल्ला
भाषणालासुरुवात करताच घोषणा आरोळ्यांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तेव्हा ‘मी हात जोडून विनंती करते, थोडी शांतता ठेवा, घोषणा देऊ नका. दोन शब्द बोलू द्या’ असे राखीने आवाहन केले. मात्र, गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नव्हते. एवढी गर्दी मतात परावर्तीत करण्याचे आवाहन करत अाता पाणी डोक्यावरून वाहून जात आहे, सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. ‘हरी पत्ती सबको प्यारी है, क्वॉर्टर सबकाे प्यारी है, पर देश, बच्चा माँ-बापका सवाल है’ अशा भावनिक मुद्याला हात घालत ‘बहोत हो गया मजाक, थोडासा सिरियस हो जाअो’ असा सल्लाही राखीने गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना देऊन टाकला. मला राजकारण येत नाही. खुर्ची नको पण तुमचे भविष्य सुधारावे हेच मला हवे असल्याचे सांगत महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

संघर्षासाठी तयार व्हा
आरपीआय म्हटली म्हणजे संघर्ष करणारी पार्टी. आमचे कार्यकर्ते दोन हात करणारे असून जीवाला जीव देणारे आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला उद्ध्वस्त करणार असल्याची घोषणा खासदार रामदास आठवलेंनी केली. बाबासाहेब अांबेडकरांचे समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागा, संघर्षासाठी तयार रहा, असे आवाहन त्यांनी केले.