आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rakhis Come From Jodhapur, Jaipur, Surat For Rakshabandhan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रक्षाबंधनासाठी बाजारात जोधपूर, जयपूर, सुरतच्या राख्या दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जयपूर, अहमदाबाद, सुरत, कोलकाता, जोधपूर, सुरत, मुंबई, राजकोट, अलवार, भोपाळ आदी शहरांतून राख्या विक्रीस आल्या आहेत. राख्यांना मागणी वाढत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

हिंदू संस्कृतीत बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेला मोठे महत्त्व आहे. यंदा रक्षाबंधन 20 ऑगस्ट रोजी असून, त्यास आता केवळ आठ ते दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गल्ली नंबर दोन, फुलवाला चौक, दत्त मंदिर, साक्री रोड, देवपूर आदी भागात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. राख्या खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत गर्दीत वाढ होईल, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. शहरात जयपूर, अहमदाबाद, सुरत, कोलकाता, जोधपूर, सुरत, मुंबई, राजकोट, अलवार, भोपाळ या शहरांतून राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. पारंपरिक बनावटीच्या राख्यांसह आधुनिक लूक असलेल्या डायमंड, सिल्व्हर आदी विविध प्रकारातील राख्या विक्रीस आहेत.


अनेक प्रकार उपलब्ध
लहान मुलांमध्ये विशेष आकर्षण असलेल्या छोटा भीम, बाल हनुमान, बाल गणेश, हातोडा, डोरोमॅन, लिटल बिअर, कुकू आदी प्रकारातील राख्या विक्रीस आल्या आहेत. राजस्थानातून लेडीलुंबा ही राखी विक्रीस आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राख्या विक्रीचा व्यवसाय करीत आहे. सध्या मागणी तेजीत आहे. दोन दिवसांनंतर मागणीत वाढ होईल. यंदा राख्यांचे अधिक प्रकार विक्रीस आले आहेत. नितीन जैन,वृषाली राखी सेंटर