आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षा खडसे यांचा जिल्हा परिषद शिक्षण सभापतिपदाचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या रक्षा खडसे यांनी आपल्या जिल्हा परिषद शिक्षण-आरोग्य सभापती पदासह सदस्यत्वाचा राजीनामा गुरुवारी दुपारी 4.30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्याकडे सादर केला. अध्यक्षांनी तो मंजूर करीत मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान, नूतन सभापतिपदाची नियुक्ती अद्याप केली गेली नसल्याचेही दिलीप खोडपे यांनी सांगितले.
शिक्षण आरोग्याबाबतच निर्णय
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगदेव-रुइखेडा गटातून रक्षा खडसे निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांना थेट शिक्षण सभापतिपदाची संधी मिळाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्या निवडून आल्याने त्यांनी गुरुवारी सभापतिपदाचा राजीनामा दिला. या वेळी अमळगाव-पातोंडा गटाचे सदस्य भगवान पाटील व देवळी-तळेगाव गटाच्या सदस्या मंगला किशोर पाटील हे राजीनामा अर्जावर अनुमोदक आहेत.
सभापतींसह सदस्यत्वाचे पद रिक्त झाले असले तरी रिक्त पदावर पोट निवडणूक घेण्यात आचारसंहितेचा अडसर येणार आहे. विधापरिषदेसाठीची आचारसंहिता या महिन्यातच लागण्याचे निश्चित आहे. यासह सप्टेंबरपासून विधानसभेची देखील आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत; यामुळे विधानपरिषदेसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी सभापतिपदाचा निर्णय न झाल्यास ही निवड रखडणार असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी अद्याप कोणाचेही नाव निश्चित केले नसल्याचे खोडपे यांनी सांगितले.