आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raksha Khadse News In Marathi, BJP Candidate, Eknath Khadse

रावेरमध्ये रक्षा खडसे यांना लोकसभेसाठी मिळणार भाजपाची उमेदवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार हरिभाऊ जावळेंऐवजी रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रेष्ठींकडून होकार मिळाला असून लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी जाहीर केले.


रावेरमध्ये जावळेंचे नाव मी सुचवले होते. मात्र, त्यानंतर खासदार ईश्वरलाल जैन, मनीष जैन यांनी आव्हान दिल्याने पक्षात संतापाची लाट होती. जैन विरोधक का असेनात परंतु त्यांचा मान ठेवून पक्षाने खडसेला उमेदवारी दिली आहे. कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या आग्रहामुळेच आम्ही उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे खडसे या वेळी म्हणाले.
दरम्यान, अनिल चौधरी यांना पक्षात घेण्यास माझा मुळीच विरोध नाही, त्यांनी आधी काम करावे, पक्षाने स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मी आग्रही असल्याचे खडसे म्हणाले.