आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली, शांती पदयात्रेतून गांधीजींना अभिवादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात गुरुवारी मूजे महाविद्यालयातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली. तसेच टॉडलर्स स्कूलतर्फे शांती पदयात्रा काढण्यात आली. यासह सामाजिक संस्था व शाळा-महाविद्यालयांतर्फे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
मूजेतर्फे सायकल रॅली
मूजे महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्र व अतुल्य युवा फाउंडेशनतर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल रॅली आणि शांतता सद्भावना प्रभातफेरी काढण्यात आली. मूजे महाविद्यालय ते पद्मालय देवस्थानापर्यंत काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.व्ही.भारंबे यांनी हिरवी झेंडी दाखवली. शिरसोली, वावडदा, म्हसावद आणि पद्मालय या ठिकाणी सहभागी विद्यार्थ्यांनी पर्यावरणरक्षण, ग्रामस्वच्छता आणि मतदान जनजागृती या विषयांवर पोवाडा आणि पथनाट्ये सादर केली. मुला-मुलींची एकत्रित शांतता व सद्भावना रॅली मूजे कॉलेजच्या मुख्य इमारतीपासून ते महात्मा गांधी उद्यानापर्यंत काढण्यात आली. तसेच उद्यानातील महात्मा गांधींच्या पुतळय़ाला सर्वांनी अभिवादन केले. त्यानंतर देशभक्तीपर गीते, महात्मा गांधींची भजने, ग्रुप डिस्कशन आदी कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी प्रा.दिलवरसिंग वसावे, महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे समन्वयक प्रा.विजय लोहार आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉँग्रेस सेवादल : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष मनोज चौधरी, विद्यार्थी संघटनेचे प्रमुख परेश कोल्हे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन यांनी गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी शाकीर पठाण, सलीम इनामदार, मनोज ठाकरे, भरत सोनवणे, ललित जाधव, मुकेश कोळी, अकबर पहेलवान, सौरभ केसवाणी, प्रतिभा शिरसाठ, लता मोरे, मंगला पाटील, दीपाली पाटील, भगत बालाणी आदी उपस्थित होते.
जिल्हा कॉँग्रेस कमिटी : जिल्हा कॉँग्रेसतर्फे कॉँग्रेस भवनात गांधींजींची प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी डॉ. जी. एन. पाटील, डॉ. ए. जी. भंगाळे, उदय पाटील, एस. के. पाटील, उत्तम सपकाळे, शाम तायडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टॉडलर्स स्कूलतर्फे पदयात्रा
गांधीजींच्या संकल्पनांबाबत समाजात जनजागृती व्हावी व अहिंसा तत्त्वाची आठवण व्हावी म्हणून टॉडलर्स स्कूलतर्फे शांती पदयात्रा काढण्यात आली. या वेळी चिमुरड्या विद्यार्थ्यांनी शांतीचा संदेश दिला. शास्त्री टॉवर चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्यास आमदार मनीष जैन, मनपा स्थायी सभापती नितीन लढ्ढा व खादी ग्रामोद्योग भवनचे अध्यक्ष लखीचंद झंवर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. संस्थाध्यक्षा अँड.रूपाली वाणी, सचिव मनीष वाणी आदी उपस्थित होते.