आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथनाट्य, रॅलीद्वारे ‘ओझोन’बाबत प्रबोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातीलविविध शाळा, महाविद्यालयांत मंगळवारी जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त रॅली, व्याख्यानासह पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट केले.
मूळजीजेठा महाविद्यालय
केसीईसोसायटीच्या ७१व्या वर्धापन दिनासह महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र विभागातर्फे पर्यावरणीय बदल ओझोन थराचा ऱ्हास या विषयावर जैन इरिगेशनचे अतिन कुमार त्यागी यांचे व्याख्यान झाले. उपप्राचार्या डॉ. देवयानी बेंडाळे, पर्यावरण विभागप्रमुख डॉ. हर्षिका कौल उपस्थित होत्या.

राऊत विद्यालयात पथनाट्य
भाऊसाहेबराऊत विद्यालयात ओझोन दिनाचा कार्यक्रम झाला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी रॅली काढून पथनाट्याद्वारे जनजागृती केली.

धनाजीनाना विद्याप्रबोधिनी
धनाजीनाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित कला वाणिज्य महाविद्यालयातर्फे ओझोन दिन रॅली काढण्यात आली. सामाजिक वनीकरण सर्वेक्षक सुभाष इंगळे यांनी रॅलीचे उद््घाटन केले.
के.के.उर्दूहायस्कूल
के.के.उर्दूहायस्कूलच्या विज्ञान मंडळ इको क्लबतर्फे ओझोन दिनानिमित्त परिसरात रॅली काढली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शमिम बानो मलिक होत्या. मुश्ताक करिमी यांनी प्रस्तावना केली.