आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरपीआयचाही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे काही जागांवर सोशल इंजिनिअरिंगचा (अन्य समाजातील उमेदवार) प्रयोग राबविणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आठवले यांनी सांगितले की, आरपीआय हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे. त्यामुळे वाटाघाटीत रिपाइंला मिळणार्‍या जागांवर अन्य समाजातील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. येणार्‍या काळात राज्यातील राजकारणाचे चित्र निश्चितच पालटणार आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शासन भ्रष्ट आहे. त्यामुळे ते पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही. आगामी काळात होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडे जागावाटपाची मागणी केली आहे. महायुतीत आरपीआयच्या वाटेला येणार्‍या जागांपैकी काही जागा ह्या अन्य समाजातील उमेदवारांना देण्याचा निर्णय आहे. आरपीआयतर्फे आगामी निवडणुकीत विधानसभेच्या 30 ते 35 आणि लोकसभेच्या 3 ते 4 जागा लढवण्याचा निर्धार आहे. पक्ष कार्यकर्त्यांचे प्रत्येक शहरात जाळे आहे. त्यामुळे त्याचा महायुतीला निवडणुकीत फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत असून या मागणीस आरपीआयचा पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.