आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त-रमेश जैन यांच्यात खडाजंगी, वैयक्तिक हेवेदावे अन‌् वादामुळे सभा गाजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिका महासभा सकाळी ११ वाजता महासभेस सुरुवात होताच प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. आयुक्त सभेला येत नाहीत; तोंड लपवतात, असा टोला रमेश जैन यांनी लगावला. हा निरोप खास दूतामार्फत आयुक्तांना कळला. ते तत्काळ सभागृहात दाखल झाले. त्या वेळी सभागृहात कर्मचारी भरतीप्रकरणी गरमागरम चर्चा सुरू होती. त्यानंतर अायुक्त अाणि जैन यांच्यात झालेली शाब्दीक चकमक.
जळगाव कर्ज, गाळे करारसारख्या विषयांमुळे विकासकामांचे गाडे रुतले असताना गुरुवारी वैयक्तिक हेवेदावे लोकप्रतिनिधी - प्रशासन यांच्यातील वादामुळेच महापालिकेची महासभा अधिक गाजली. महासभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन अाणि मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. आयुक्त सभागृहात येत नाहीत. तोंड लपवतात, असा थेट आरोप जैन यांनी केला. त्या वेळी आयुक्त १३ व्या मजल्यावरील आपल्या केबिनमधून तात्काळ सभागृहात आले. कधीही तोंड लपवले नाही. उगाच काहीही बोलू नका, अशा शब्दात जैन यांना सुनावले. शब्दाने शब्द वाढत गेला. कुणीही माघार घ्यावयास तयार नव्हते. अधिकारी-नगरसेवकांनी मध्यस्थी केली. अखेर नगररचना विभागातील सहा अभियंत्यांच्या बडतर्फी प्रकरणी १५ दिवसांत योग्य ती कारवाई करण्याची घोषणा करून अायुक्त सभागृहाबाहेर पडले. यापूर्वीही एकदा रमेश जैन तत्कालीन अायुक्त प्रवीण गेडाम यांच्यात खडाजंगी झाली हाेती. त्या वेळी दाेघेही हमरी-तुमरीवर अाले हाेते.
जैन : आयुक्तसभागृहात येत नाही. तोंड लपवतात. प्रशासन काम करीत नाही.
आयुक्त: मीकधीही तोंड लपवलेले नाही. उगाच काहीही बोलू नका.

जैन: महासभेतीलठरावांची अंमलबजावणी होत नाही. नगररचनाकार आणि सहा अभियंत्यांवर बडतर्फीचा ठराव झाला होता. हा ठराव होऊनही कारवाई झाली नाही. आयुक्त कारवाई करीत नाही. दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात.

आयुक्त: पाठीशीघालण्याचा प्रश्नच नाही. बडतर्फीची कारवाई फार मोठी असते. यासाठी खातेनिहाय चौकशीची गरज आहे. विधी विभागाचा अहवाल मागवला आहे. त्यांनी काहीही कळवलेले नाही. त्यांनी कळवल्यानंतरच कारवाई होणे अपेक्षित आहे.

जैन: (आवाज चढवून ) तुम्ही अधिकाऱ्यांना संरक्षण देता.

आयुक्त: (संतापून) संरक्षण देणे वगैरे काहीही नाही. तुम्ही आधी कायदा तपासा, समजून घ्या.

जैन: आम्हीकेलेला ठराव चुकीचा असेल तर तो विखंडनासाठी का पाठवला नाही ?

आयुक्त: ठरावालामहत्त्व आहेच. वाटल्यास विखंडनालाही पाठवेल.

जैन: (आवाजचढवून ) हा सभागृहाचा अवमान करण्याचा प्रयत्न आहे.

आयुक्त: मीकुठलाही अवमान केला नाही. आवाज चढवून बोलू नका. जोरात बोलतात म्हणजे सगळे खरे आहे असे नाही. मलाही बोलता येते. कशाला दबाव आणता. कशासाठी असे जोरात बोलता? मी कधीही तोंड लपवले नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात, सभागृहाचा सन्मान राखा. नेहमी अरेरावीने बोलतात, अशा पद्धतीने मी एेकून घेणार नाही. आम्हालाही आवाज चढवून बोलता येते. अचानक आयुक्तांनी राजमुद्राचा विषय छेडला आणि सभागृहातील वातावरण आणखीनच तापले.
आयुक्त: तुम्हीराजमुद्राचा दोन ते अडीच कोटींचा कर लपवण्यासाठी किती वेळा कोर्टात जातात.

जैन: हावैयक्तिक प्रश्न आहे. सभागृहाचा मुद्दा नाही. आपल्या बचावासाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. मी वैयक्तिक वाद करीत नाही. राजमुद्राच्या विषयावर सर्वच नगरसेवकांनी वादात उडी घेतली.

सर्वनगरसेवक : सभागृहाचाअवमान करणाऱ्यांवर कारवाईचा ठराव होतो. तरीही कारवाई होत नाही. हा अवमान नाही का? ठराव विखंडनाला पाठवा नाही तर कारवाई करा. नगरसेवकांच्या मागणीनंतर विधी विभागाकडून १५ दिवसांत अभिप्राय मागवून घेतो.त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले आणि ते सभागृहाबाहेर पडले.