आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramesh Munde's Suspension Proposal Hand Over To Police Directorate

रमेश मुंडेंचा निलंबनाचा प्रस्ताव महानिरीक्षकांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - गुन्ह्यातील चारचाकी वाहन सोडण्यासाठी लाख २० हजारांची मागणी केल्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश मुंडे यांचा निलंबनाचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ते शहरातून गायब झाले आहेत. अद्यापपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

बनावट विषारी मद्याबाबत गुन्ह्यात गुन्हेगाराकडून ताब्यात घेतलेली कार सोडण्यासाठी लाख २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रमेश मुंडे, सपोनि कमलाकर पाटील, पोकॉ. अशोक पायमोडे घटनास्थळावरील वॉइन शॉपचा व्यवस्थापक शंकर मेघानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाटील, पायमोडे यांना काल मंगळवारी निलंबित करण्यात आले. तसेच रमेश मुंडेंचा निलंबनाचा प्रस्ताव आयजींकडे पाठवला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिस विभागाला जबर धक्का बसला आहे.