आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान महिन्याच्या उपवासात घ्या हलका आहार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- इस्लाम धर्मामध्ये रमजान हा पवित्र महिना समजला जातो. या महिन्यात उपवास करताना आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या काळात हलके जेवण करा, असा सल्ला वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला. रमजानमध्ये महिनाभर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाणी आणि भोजन काहीच घेतले जात नाही. दैनंदिन आहार वेळेतील बदलामुळे आरोग्यात बिघाड होण्याची शक्यता असते.
कुराण या धर्मग्रंथातही आजारी लोकांनी उपवास करू नये असे म्हटले आहे. त्यामुळे लहान मुले, गर्भवती महिला, आजारी, वृद्ध, मानसिक रुग्ण आदींनी उपवास करू नये. आजारी व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा. मुधमेह, हृदयरोग असणार्‍यांनी शक्यतो उपवास करूच नये, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. रोजच्या आहाराच्या सवयीत बदल करून अन्न व पाण्याशिवाय राहिल्याने पित्त, अपचन आदी समस्या उद्भवू शकतात. मधुमेह व हृदयरोग असणार्‍यांनी तेल, कबाब, बिर्याणी आणि चिकन या पदार्थांपासून दूर राहावे.

>नाश्त्यात करा फळे आणि पालेभाज्यांचा समावेश

>उपवासामध्ये फ ळे व फळांचा ज्यूस घेणे फायदेशीर आहे. गहू, ज्वारी, बाजरी, दाळ, तांदूळ हे पचायला जड नाहीत व दिवसभर भूकही लागत नाही. तसेच पालेभाज्या, दूध घेणेही चांगले.

वैद्यकीय सल्ला
भरपेट आहार टाळा, आहाराच्या वेळांमध्ये अचानक बदल झाल्याने अँसिडिटी आणि गॅसेसचा होऊ शकतो त्रास

असे आहेत फळांचे दर

फळ भाव
सफरचंद 140 ते 160
मोसंबी 40ते 60
डाळिंब 100 ते 180
संत्री 80

फळांची रेलचेल
रमजानसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध फळांची आवक वाढली आहे. तसेच परराज्यातून फळे विक्रीसाठी मागविले जात आहेत.

हलके जेवण करा
व्हीटॅमिन, क्षार युक्त पदार्थांचे सेवन करावे. तसेच कंदमुळे जास्तीत जास्त प्रमाणात खावे यामुळे एनर्जी देखील टिकून राहते. यातच पुर्ण फळे आणि ज्युसचा दररोजच्या आहारात वापर करावा व हलके जेवण घ्यावे.
-मृदुला कुळकर्णी, आहारतज्ञ

प्रोटीनयुक्त पदार्थ घ्या
उपवास काळात प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. प्रोटीनअभावी भूकही लागते आणि वजनही कमी होते. चिकन, लौंबा, अंडा आणि सी-फूड घ्या.