आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात बिल्डरकडून महिलेवर बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घराच्या सौद्याचे पैसे परत न केल्याने गरिबीचा फायदा घेत 44 वर्षीय महिलेवर दोन वर्षे जळगाव, धुळे येथे बलात्कार झाला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. शिव कॉलनीतील आरोपी बिल्डर भाऊसाहेब दादाजी देवरे याचे पीडित महिलेच्या घराच्या सौद्यातील काही, तसेच 12 हजार रुपये उसनवारीची रक्कम घेणे होते. ही रक्कम देण्यास महिलेकडून उशीर होत असल्याचा फायदा उचलत आरोपीने स्वत:च्या घरी, फिर्यादीच्या घरी, धुळे येथील गणपती पॅलेस हॉटेलमध्ये ऑक्टोबर 2010 ते 22 डिसेंबर 2012पर्यंत बलात्कार केला. या संदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.