आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलींच्या पित्याचा शेजारील मुलीवर अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आपलीपत्नी आणि मुले परगावी गेल्याची संधी साधून एका नराधमाने शेजाऱ्याच्या अल्पवयीन मुलीस आपल्या घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रामेश्वर कॉलनी परिसरातील तुळजामातानगरमध्ये घडली.

इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणारी मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून शुक्रवारी या नराधमाने तिला आपल्या घरात बोलावून दुष्कर्म केले. रविवारी घटना उघडकीस आल्यानंतर तो फरार झाला.विशेष म्हणजे या नराधमासही दोन मुली असून त्यापैकी एका मुलीचे वय पिडीत मुली एवढेच आहे.

तुळजामातानगरमध्ये गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील पती, पत्नी आणि तीन मुली असे कुटुंब भाड्याने राहते. तसेच वरच्या मजल्यावर िजतेंद्र कैलास खंडारे (वय ४०, मूळ रा. माझाडे िज. अकोला) हा राहतो. तो एमआयडीसीमधील नवरंग प्लास्टिकमध्ये कामाला आहे. िजतेंद्रची पत्नी आणि त्याच्या दोन मुली आणि एक मुलगा दिवाळीच्या सुटीनिमित्ताने गावाला गेलेले आहेत. खंडारेच्या घराच्या खालच्या मजल्यावर ही पिडीत मुलगी राहते. त्या दुर्देवी मुलीचे वडील मनाेरुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पीडित मुलीची आई त्यांना उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. शुक्रवारी ही मुलगी घरी एकटी असल्याचे बघून खंडारेने ितला घरात बाेलवून घेतले आणि ितचे तोंड दाबून दुष्कर्म केले.

अत्याचाराची घटना पीडित मुलीच्या आईला समजल्यावर ती प्रचंड घाबरली. त्यामुळे तिने घटनेची वाच्यता केली नाही परंतु रविवारी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर िशवसेनेेचे महानगराध्यक्ष गणेश सोनवणे, मंगला बारी, शोभा चाैधरी यांनी त्या महिलेला गुन्हा दाखल करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले. त्या िठकाणी िजतेंद्रवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तो फरार असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेबाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे.

आरोपीस पीडितेएवढीच मुलगी
विशेषम्हणजे खंडारे यास दोन मुली असून त्यापैकी एक मुलगी १२ वर्षांची आहे. ती दुर्दैवी मुलगीही १२ वर्षांची आहे. अत्याचाराची घटना पीडित मुलीच्या आईला कळल्यानंतर सामाजिक दडपणामुळे तिने वाच्यता करणे टाळले होते. रामेश्वर कॉलनी परिसरातील तुळजामातानगरात संतापजनक घटना