आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिस कर्मचा-यावर अत्याचार, उपनिरीक्षकाविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लग्नाचे अामिष दाखवून जळगाव, नाशिक, पुणे येथे बलात्कार केल्याप्रकरणी महिला पाेलिस कर्मचा-याने दिलेल्या तक्रारीवरून चंद्रपूर येथील पोलिस ठाण्यात नियुक्त पाेलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूषण सुपडू काेळी असे अाराेपीचे नाव अाहे. चंद्रपूर शहर पाेलिस ठाण्यात पाेलिस उपनिरीक्षक असलेल्या भूषण काेळी याने पीडित महिला पाेलिस कर्मचा-यास लग्नाचे अामिष दाखवले. त्यानंतर २८ अाॅगस्ट २०१४ ते २९ अाॅगस्ट २०१४ दरम्यान सकाळी ११ वाजेपर्यंत पुणे येथील मंगळवार पेठेतील राजधानी हाॅटेलमध्ये तसेच २२ अाॅक्टाेबर २०१४ राेजी रात्री जळगाव रेल्वे स्टेशनजवळील साईराम रेसिडेंसी येथे. जानेवारी २०१५ राेजी रात्री नाशिक येथील हाॅटेल मथुरामध्ये १८ फेब्रुवारी २०१५ राेजी चंद्रपूर येथील साया हाॅटेलमध्ये बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. लग्न करण्याबाबत विचारले असता, भूषणचे नातलग दीपक सुपडू काेळी, सुपडू काेळी, कमळबाई सुपडू काेळी, कैलास चाैधरी, हितेश यादव अन्य जणांनी तिला धमकावले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात सोमवारी उशिरा गुन्हा दाखल केला. आरोपी हे रावेर तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलिस अधिका-याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली.

विसरण्यासाठी जीवे मारण्याची धमकी
भूषणलाविसरून जा. ताे तुझ्याशी लग्न करणार नाही. लग्नाचा अाग्रह धरला तर तुला तुझ्या कुटूंबीयांना जीवेठार मारू, अशी धमकी दिली. तसेच चापटा, बुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले अाहे. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...