आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: अल्पवयीन मुलीवर शेतात नेऊन अत्याचार, दोन नराधम पोलिसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- गावात कामासाठी गेलेली दहावीतील विद्यार्थिनी घरी परतत असताना तिला बाेलावून घेत शेतात नेऊन अत्याचार करणाऱ्या दाेघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. अत्याचार करणारा अाणि त्याला मदत करणाऱ्या दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला अाहे.पंधरा दिवसांपूर्वी ही घटना घडली. 

तालुक्यातील एका गावातील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी एकाच्या घरी कामानिमित्त गेली. तिथून परत घरी जात असताना तिला रस्त्यात जागऱ्या उर्फ हिलाल रमेश गायकवाड याने बाेलावून शेतात नेले. त्या वेळी त्याच्याबराेबर पप्पू उर्फ एकनाथ पांडुरंग माेरे हाेता. शेतात नेल्यावर जागऱ्या गायकवाड याने अत्याचार केला. तर पप्पू माेरे याने तेथे उभे राहत त्याला मदत केली. यानंतर तिला त्रास हाेऊन लागल्याने तिने गावातील एका डाॅक्टरला दाखविले. मात्र डाॅक्टरने तिला सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. मात्र अधिक त्रास हाेत असल्याने तिने बाहेरगावच्या बहिणीला गावात बाेलावले. ती अाल्यानंतर तिच्यासमाेर सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानुसार तिच्या भाऊ, बहिणीसह पीडित मुलीने तालुका पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. तिची तक्रार महिला उपनिरीक्षक एन.डी. घुगे यांनी इनकॅमेरा नाेंदविली. तिच्या तक्रारीवरून जागऱ्या गायकवाड, पप्पू माेरे या दाेघांविरुद्ध लहान मुलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला. दाेघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. तपास उपनिरीक्षक दीपक ढाेके करीत अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...