Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Rape On Minor Age Girl In Jalgaon

चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; न्यायालयाने आरोपीस सुनावली 10 वर्षाची शिक्षा

चार वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी संशयित आरोपीला दोषी धरत १० वर्षे सक्तमजुरीच

प्रतिनिधी | Oct 10, 2017, 09:28 AM IST

  • चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; न्यायालयाने आरोपीस सुनावली 10 वर्षाची शिक्षा
जळगाव-चार वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी संशयित आरोपीला दोषी धरत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. नेमलाल सुकलाल पाटील (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे.

धरणगाव शहरात राहणाऱ्या चार वर्षीय बालिकेवर २१ फेब्रुवारी २०१३ रोजी पाटील याने घरात बाेलावून तिच्यावर अत्याचार केले होते. बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात अाराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायाधीश के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षाने पीडित बालिकेची आई, पंच राहुल बडगुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा निरमले, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक डी. एस. सिनगारे आणि दिलीप गढरी या पाच साक्षीदारांच्या साक्ष घेतल्या होत्या.

दाेन्ही बाजूच्या युक्तिवाद एेकून न्यायालयाने सोमवारी आरोपी नेमलाला पाटील याला दोषी धरले. त्याला १० वर्षे सक्तमजुरी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील हजार रुपये फिर्यादीस देण्याचे आदेश न्यायालयानेे दिले आहेत. सरकारपक्षातर्फे अॅड.सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

Next Article

Recommended