आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; असे काय घडले की उघडकीस आला प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याची संतापजनक घटना जळगावात घडली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. जामोद तालुक्यातील बोराळा बुद्रुक येथे ही संतापजनक घटना घडली.
 
बोराळा येथील पीडित मुलीच्या आईचे मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेड येथील अशोक नावाच्या व्यक्तीशी दुसरे लग्न झाले होते. या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगी असून ती अल्पवयीन आहे. लग्नानंतर तिघेही तालखेड येथेच राहायचे. मात्र काही महिन्यांपासून ते बोराळा येथे राहण्यासाठी आले होते. आठ ते दहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना सावत्र पित्याने तिच्यावर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित मुलगी घाबरली व ही बाब तिने कुणालाच सांगितली नाही.

याचाच फायदा घेत आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करतच राहिला. परंतु त्या मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला गर्भधारणा झाली असल्याचे सांगितले. हे ऐकून मुलीच्या आईला धक्काच बसला त्यामुळे तिने जळगाव जामोद पोलिस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...