आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचारी आरोपीस १० वर्षांची शिक्षा, चाळीसगाव प्रकरणात जळगाव कोर्टाचा निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या ईश्वर राखुंडे याला चाळीसगाव न्यायालयाने दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. के. पटनी यांनी बुधवारी हा निकाल दिला. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षक कायद्यांतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चाळीसगाव येथील आनंदवाडीतील ईश्वर लक्ष्मण राखुंडे (वय २०) याने त्याच्याच घराजवळील १५ वर्षीय मुलीला मे २०१५ ला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर त्याने मनमाड, कल्याण, अंबरनाथ अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलीला घेऊन जाऊन वारंवार अत्याचार केला. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसांनी त्याला पकडून आणले. त्यानंतर त्याच्यावर अपहरणाचा, बलात्काराचा तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी न्यायाधीश पटनी यांच्या न्यायालयात पीडित मुलीचा जबाब तसेच तिच्या आई, वडील, डॉ. सुलभा साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक डी. एस. पाकळे यांच्या साक्षी झाल्या. राखुंडेला अपहरण केल्याप्रकरणी कलम ३६३ अंतर्गत वर्षे शिक्षा, बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायद्यांतर्गत कलम ३६६ प्रमाणे १० वर्ष शिक्षा आणि बलात्कार केल्याप्रकरणी कलम ३७६ अंतर्गत १० वर्षे शिक्षा सुनावली. राखुंडे १२ मे २०१४ पासून ईश्वर न्यायालयीन कोठडीत आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. संभाजी जाधव यांनी तर आरोपीतर्फे अॅड. एस. बी. पाटील यांनी कामकाज पाहिले.
बातम्या आणखी आहेत...