आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1818 मधील नाण्यावर होती राम-लक्ष्मण अन् सीतेची प्रतिमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राजा-महाराजांच्या काळापासून ते ब्रिटिश राजवटीपर्यंतच्या कार्यकाळात वापरात असलेली नाणी संकलित करण्याचा छंद शिवाजीनगरातील मोहंमद अबू बकर मोहंमद हसन यांनी जोपासला आहे. 1818 मधील राम-लक्ष्मण आणि सीता यांची प्रतिमा असलेले दुर्मीळ नाणी त्यांच्या संग्रही आहे.

नाणी संकलनाचा छंद काही नवीन नाही. अनेक जणांनी हा छंद जोपासला आहे. ऐतिहासिक दुर्मीळ नाण्यांचा संग्रह करणारी फारच थोडी माणसे आहेत. बहुधा आपल्या मोठय़ा संग्रहालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी पाहायला मिळतात.

हसन यांनीही दुर्मीळ अशा नाण्यांचा संग्रह केला असून त्यांच्याकडे जवळपास 250 ते 300 नाणी असून ती सर्व दुर्मीळ आहेत. शालेय शिक्षण घेत असताना त्यांना नाणी संग्रह करण्याचा छंद जडला. तेव्हापासून आजतागायत नाण्यांचे संकलन ते करीत आहे. विशेष म्हणजे 100 वर्षांपूर्वीच नव्हे तर राजा-महाराजांच्या काळातील नाणी त्यांच्याकडे आहेत. अमेरिका, जपान, सौदी अरेबिया, इंडोनेशिया यासह 40 देशांतील वेगवेगळ्या प्रकारची नाणी त्यांच्या संग्रही आहेत

नाशिक - 1818 मधील राम-लक्ष्मण आणि सीता तर दुसर्‍या बाजूला हनुमानाची प्रतिमा असलेले दुर्मीळ नाणे त्यांच्याकडे पाहावयास मिळाले. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीची नाणी देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. 800 ते 900 वर्षांपूर्वीची आकाराने जाडसर असलेल्या नाण्यांवर देवनागरी लिपी असून या नाण्यांवर कोरीव नक्षीकाम केलेले आहे.

जुन्या वस्तूंचेही रेकॉर्ड
पुरातन नाणी जमा करण्यासोबतच जुन्या काळातील वस्तू जमा करण्याचाही छंद हसन यांना आहे. त्यांच्याकडे ब्रिटिशकालीन टेपरेकॉर्डर, रेडिओ देखील त्यांनी सांभाळून ठेवले आहेत. त्यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय असल्याने त्यांच्या दुकानात जुन्या वस्तूच अधिक दिसतात.

जुन्या वस्तुंचे संग्रहालय उभारण्याचा मानस
नाण्यांसह जुन्या वस्तूंचे संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. परंतु संग्रहालयासाठी तेवढी नाणी नाहीत. लहानपणापासून नाणी संकलित करत असून आजतागायत 300 नाणी जमा केली आहेत. एवढेच नव्हेतर नोटादेखील त्यांच्या संग्रहात आहेत. ही नाणी मिळवण्यासाठी काहींना जादा पैसे देखील त्यांना द्यावे लागले. मोहंमद अबू बकर हसन

टाकसाळीही उपलब्ध
मोगलांच्या काळात आग्रा, बिहार, लाहोर, अहमदाबाद, अहमदनगर, सोलापूर, विजापूर, आणि बंगाल मधील अनेक शहरांत टाकसाळी सुरू झाल्या होत्या. तेथील देखील नाणी हसन यांच्या संग्रही आहेत.